Goa Environment: पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास क्रिकेटपटू, अभिनेते जबाबदार!

बेकायदा बांधकामे : डोंगर, माळरानाला सर्वाधिक पसंती
Sea
SeaDainik Gomantak
Published on
Updated on

एरवी पर्यावरणाचा समतोल राखा, निसर्ग वाचवा, असे भावनिक आवाहन सिने अभिनेते आणि क्रिकेटपटू जाहिरातींच्या माध्यमातून करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात पर्यटनाचा ऱ्हास करत बेकायदा बांधकामे उभारण्यात हेच क्रिकेटवीर आणि सिने अभिनेते गुंतल्याचे धक्कादायक चित्र दिसते. त्यावेळी भावनिक संदेश देणारे ते हेच सिने अभिनेते आणि क्रिकेटवीर का, असा प्रश्न लोकांना पडतो.

पेडणे तालुक्यातील मांद्रे, आश्वे, हरमल या किनारी भागातील जमिनी सिने अभिनेते, निर्माते आणि क्रिकेटपटूंनी विकत घेतल्या आहेत. किनारी भागातील जमिनी विकून संपल्यानंतर या लोकांच्या नजरा डोंगर, माळरानावरील जमिनींवर खिळल्या आणि या जमिनी विकत घेऊन तेथे आलिशान फार्म हाऊस, बंगले उभारण्याचे काम जोरात सुरू आहे.

मात्र, या बेकायदा बांधकामांना लगाम घालण्यासाठी मांद्रेचे युवा सरपंच ॲड. अमित सावंत यांनी पुढाकार घेतल्याने इतर गावांचे सरपंच, उपसरपंच आणि पंचायत मंडळ पुढाकार का घेत नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांना व पंचायत मंडळाला हाताशी धरून ही बांधकामे केली जातात. ही बडी मंडळी पंचायतीचा महसूल बुडवत आहेत. मोरजी, मांद्रे गावातील साधनसुविधा, वीज, पाणी, रस्ते या सुविधा ही मंडळी वापरतात.

मात्र, त्यांचा त्या गावाच्या विकासाला काहीही हातभार लागत नाही किंवा महसूल वाढवण्यासाठी पंचायत मंडळही उपाययोजना करत नाही. यावर नियंत्रण आणले नाही तर एक दिवस केरळची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sea
Amit Patkar: भाजपचा 'कोरोना' सोयीनुसार पसरतो; अमित पाटकर यांची खोचक टीका

समुद्रकिनारी नियम धाब्यावर

शापोरा नदी किनारी आणि अरबी समुद्राच्या किनारी भागात सध्या बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यात स्थानिकांपेक्षा गावाबाहेरील आणि बिगर गोमंतकीयांचा जास्त समावेश आहे. नदी किनाऱ्यापासून 100 मीटरच्या आत तर समुद्राच्या भरतीरेषेपासून 200 मीटरच्या आत कोणतेही बांधकाम करता येत नाही. मात्र, हा कायदा स्थानिकांना लागू आहे, मग बाहेरच्यांना का नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com