Kamdhenu Yojana: गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्वागत केले आहे
Mla Divya RaneDainik gomantak

Goa Government: ‘कामधेनू’त बदल,धनगर समाजाला दिलासा; आमदार डॉ. राणे यांचे आभार

Kamdhenu Scheme Goa: गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्वागत केले आहे
Published on

पिसुर्ले: राज्य सरकारने ‘कामधेनू’ योजनेमध्ये बदल करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने राज्यातील धनगर समाजाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच या विषयावर आवाज उठविल्‍याबद्दल पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने ‘कामधेनू’ योजनेमध्ये बदल करून सुधारीत योजना अंमलात आणली. परंतु जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सदर योजनेत दुरूस्ती करण्‍याची मागणी केली होती.

त्यानुसार सरकारने या योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खुद्द आमदार राणे यांनी चालू विधानसभा अधिवेशनात बोलताना दिली. त्‍यामुळे राज्यातील धनगर समाजाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.

Kamdhenu Yojana: गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्वागत केले आहे
Valpoi News : कामधेनू योजनेतील गायी गोठ्यात बांधणे बंधनकारक : मुख्यमंत्री

राज्यात सन २०१२ साली सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांनी दुग्धव्यवसायात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अंमलात आणलेल्या ‘कामधेनू’ योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे राज्यात दुधाचे प्रमाण चांगल्‍यापैकी वाढले.

परंतु या योजनेत सरकारने नंतरच्या काळात बदल करून ज्या शेतकऱ्यांच्‍या नावावर जमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, अशी अट घातली. त्यामुळे राज्यातील धनगर समाज व जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी हा विषय मागच्या अधिवेशनात उपस्थित केला होता.

आता सरकारने ‘कामधेनू’ योजनेत बदल करताना जमिनीची अट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आमदार दिव्या राणे यांनीच विधानसभा अधिवेशनात बोलताना दिल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परिणामी राज्यातील दुध उत्पादनातही वाढ होणार असल्याने सरकार त्‍यात ‘स्वंयपूर्ण’ होणार आहे ‌.

Kamdhenu Yojana: गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सरकारच्‍या या निर्णयाचे स्वागत केले आहे
Kamdhenu Scheme Goa: 'पशुसंवर्धन'कडून महत्वाचा निर्णय; गायींना रस्‍त्‍यांवर सोडणाऱ्या मालकांवर आता...

राज्‍यातील दुग्‍धोत्‍पादनात होणार वाढ!

‘कामधेनू’ योजना सुरू केल्यानंतर सत्तरी तालुक्याच्‍या भुईपाल गावातील बऱ्याच धनगर समाजबांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न केला. या भागातील शेतकऱ्यांच्‍या नावावर जमिनी नसल्याने त्यांना बऱ्याच सुविधांचा लाभ मिळत नव्हता. परंतु आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नामुळे सरकारने ‘कामधेनू’ योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याने या योजनेचा फायदा धनगर समाजबांधवांना घेण्यास सुलभ होणार आहे, असे गोवा धनगर समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com