फातोर्डा: मडगाव येथील श्री हरि मंदिर देवस्थानतर्फे कार्तिकी एकादशीच्या (Ekadashi) वार्षिक 112 व्या दिंडी महोत्सवाला आज पासुन सुरुवात झाली. या उत्सवाचा समारोप गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी गोपाळकाला, महाआरती व तीर्थप्रसादाने होईल. आजपासुन पुढील सात दिवस देवस्थानने विविध धार्मिक (Religious) व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र दिंडी निमित्त 17 रोजीची गायन बैठक व श्रीची पालखी मिरवणुक रद्द करण्यात आली आहे.
आज सकाळी 8 वाजता श्रीची विविवत श्रींची षोडपचार महापुजा व इतर धार्मिक विधी करण्यात आले. नंतर संध्याकाळी दिंडी महोत्सवाचे उदघाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते प्रसिद्ध प्रवचनकार रमेश सप्रे गुरुजी यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलाने झाले. नंतर प्रसिद्ध प्रवचनकार रमेश सप्रे गुरुजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आमदार कामत यानी सांगितले की कोविड महामारी अजुन पुर्णपणे संपुष्टात आलेली नाही त्यामुळे यंदाही दिंडी उत्सव सोहळा साधेपणानेच साजरा करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय स्तुत्य असाच व लोकांच्या हिताचा आहे. या वेळी त्यानी लहानपणीच्यां दिंडी उत्सवाची माहिती दिली. कीर्तन व प्रवचनातुन चांगले संस्कार घडतात असेही ते म्हणाले.
श्री हरि मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत (Suhas Kamat) यानी सर्वांचे आभार व्यक्त केले व पुढील सात दिवस दिंडी उत्सवाला भाविकांनी उपस्थिती लावावी असे सांगितले. सप्रे यांचे प्रवचन 12 व 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. नंतर 14, 15 व 16 असे सलग तीन दिवस संध्याकाळी 7 वाजल्ययापासुन वाळपई येथील ह.भ.प.. विवेकबुवा जोशी यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार 17 नोव्हेंबर या कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी सकाळी 8 वाजल्यापासुन धार्मिक विधिंना सुरुवात होईल. नंतर 10 वाजल्यापासुन सुरेंद्र बोरकर व साथी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 वाजता श्री विठ्ठल रखुमाईची (Vitthal Rakhumai) धार्मिक ग्रंथासह मंदिरा भोवती प्रदक्षिणा व 7 वाजल्यापासुन भक्तीरंग, मडगाव तर्फे भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.