संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या डॉ.गावकरांनी केले शेतीत आधुनिक प्रयोग

संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे डॉ.प्रवीण गावकर (Dr. Praveen Gavkar) आता कृषी क्षेत्रात ही गेल्या वर्षापासून नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत.
Dr. Praveen Gavkar
Dr. Praveen GavkarDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे डॉ.प्रवीण गावकर आता कृषी क्षेत्रात ही गेल्या वर्षापासून नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. घरा समोर शेती करायचा आनंद वेगळा असतो. हिरवीगार वाऱ्यावर डोलणारी शेती डोळ्यांना सुखद अनुभव देते.

(New experiment of agriculture in Goa)

Dr. Praveen Gavkar
गोवा गुदमरतोय गलिच्छतेच्या गर्ततेत

विशेष म्हणजे सहसा गोव्यात (Goa) न पिकणारा इंद्रायणी भाताची लागवड करण्यात येते. हा भात मावळ भागात खूप पिकतो. बसुमाती आणि आंबे मोहोर भाताच्या बियांणाचा संकर म्हणजेच इंद्रायणी भाताची जात.

गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाला आणि या वर्षीही तोच भाताची लागवड शेतात (Rice Farming) केली असल्याचे डॉ.गावकर यांनी सांगितले.सद्या भाताच्या तरव्याची लागवड केल्यानंतर शेती तरारून आली आहे.

या वायंगणी पिकाला पाणी जास्त लागतं. त्यामुळे वेगवेगळ्या विहिरीतून पाणी आणून पीक घेण्यात येत आहे. हा भात छोटा असून, जरा तांबूस रंग असतो व बासुमती सारखा सुगंध येतो.शेतीला पण एक विशेष सुगंध येतो.

तसा हा प्रयोग खर्चिक आहे. पुण्याहून बी मागवलं जातं, कामगार मिळणे ही एक मोठी डोकेदुखी असते, शिवाय भातापासून तांदूळ करण्यासाठी कर्नाटक राज्यातल्या अणशी घाटातील भात गिरणीवर जावं लागते.

परंतु हिरवीगार शेती, थंडगार वातावरण, आणि जवळ जवळ साडे तीन महिन्यां नंतर मिळणारा सुवासिक भात यामुळे कष्ट आणि खर्च याचा विसर होतो..

आठवडाभर पणजीत संजीवन अकादमीत संगीताची सेवा करून गावात शनिवार आणि रविवार शेती करायची हौस वेगळाच आनंद देऊन जात असते असे डॉ.गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com