Ponda Master Plan|फोंडा शहरासाठी लवकरच मास्टरप्लान

पालिका बैठकीत अनेक विषय चर्चेत: गुरांचा बंदोबस्त, पार्किंगसाठी सूचना फलक
Ponda Municipality News
Ponda Municipality NewsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा शहराच्या मास्टरप्लानचा आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून हा मास्टरप्लॅन तयार झाल्यावर पालिका मंडळ तसेच फोंडावासीयांना विश्‍वासात घेऊनच अंतिम आराखडा निश्‍चित केला जाईल, अशी माहिती फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली. या बैठकीला फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते.

(Masterplan for Fonda City coming soon)

Ponda Municipality News
Health Care: होमिओपॅथी, आयुष सेवांसाठी वेगळे संचालनालय

फोंडा पालिकेच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषयांवर गरमागरमी झाली, पण ती शमली आणि संबंधित विषयांवर योग्य निर्णय घेण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, नगरसेवक व्यंकटेश नाईक, प्रदीप नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, शांताराम कोलवेकर व इतर नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

फोंड्याचा मास्टरप्लान तयार करून फोंडावासीयांना सुविहित सुविधा उपलब्ध करणे, फोंडा शहरातील पार्किंग, वाहतूक तसेच इतर समस्या दूर करणे यासाठी दोन महिन्यांपूर्वी फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंडा नगराध्यक्ष व इतर नगरसेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली होती. या चर्चेनुसार फोंडा शहराचा मास्टरप्लान तयार करण्यासाठी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने मान्यता दिली असून शहराचे योग्य नियोजन करण्यासाठी प्लानरला नियुक्त केले असून लवकरच शहराचा आराखडा तयार करून तो चर्चेसाठी पालिकेकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय फोंडा मार्केटसंबंधीचाही मास्टरप्लान तयार करण्यात येणार असून त्याचीही कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.

फोंडा पालिका क्षेत्रात पार्किंगसाठी जागा आरक्षित केली असली तरी अजून सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत, हे सूचना फलक लवकरच तयार करून ते लावण्यात येणार आहेत. पालिका अभियंता तसेच कायदेविषयक बाबीसाठीही एकच वकील असल्याने पालिकेतर्फे नवीन उत्तीर्ण झालेले दोन सिव्हिल अभियंता तसेच एका नवीन वकिलाची नियुक्ती मानधन तत्त्वावर एका वर्षासाठी केली जाणार असून उत्तीर्ण नवोदितांना त्यासाठी मासिक दहा हजार रुपये मानधन तसेच सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे. पथदीपांसंबंधीही योग्य निर्णय घेण्यात आला असून वीज खात्याकडे पथदीप व्यवस्था सोपवण्यात येणार आहे, त्यासंबंधी ठराव घेण्यात आला.

Ponda Municipality News
Goa: कुंकळ्ळीतील लढ्याच्या इतिहासाचा विपर्यास निषेधार्ह

फोंड्यात आता रस्त्यांवर गुरे नसतील!

फोंडा पालिका क्षेत्रात गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने निविदा काढली होती, त्यासाठी सोळा लाख रुपयांची निविदा संमत झाली असून निरंकाल भागात गुरांसाठी कोंडवाडा उभारून पालिका क्षेत्रातील गुरांची रवानगी तेथे करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडून गुरांना नेण्यासाठी एका वाहनाची सोय केली जाणार असून गुरांना पकडण्यासाठी माणसांचीही नियुक्ती होणार आहे. त्यानंतर फोंडा शहरातील भटक्या गुरांचा त्रास कमी होईल, असे पालिका मंडळाने स्पष्ट केले.

पालिकेच्या जागेबाबत वाद!

फोंडा पालिका इमारतीलगत असलेल्या खुल्या जागेत प्रदर्शने भरवण्यात येत आहेत. या शेतजमिनीचा वापर पावसाळ्यात पाणी साठत असल्याने तसेच चिखलामुळे केला जात नाही, त्यासाठी ही जमीन समपातळीवर आणून वापरण्यायोग्य करण्याची आवश्‍यकता आहे, मात्र या ठिकाणी सोय न करताच मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने नगरसेवक व्यंकटेश नाईक व इतरांनी आक्षेप घेतला. मातीचा भराव टाकणाऱ्या संबंधित बिल्डरला पालिकेने नोटीसही पाठवली आहे. या विषयावरून नगरसेवक व्यंकटेश नाईक व पालिका मुख्याधिकारी योगराज गोसावी यांच्यात ‘तू तू मै मै’ झाली, पण नंतर वाद शमला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com