Curchorem Food Court : कुडचडे फूडकोर्ट बनला ‘पांढरा हत्ती’

शुकशुकाट : अडीच महिन्‍यांपूर्वी उद्‌घाटन; गाडेधारकांची गैरसोय
Curchorem Food Court
Curchorem Food CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Curchorem Food Court कुडचडे येथे फूडकोर्टचे उद्‌घाटन होऊन अडीच महिने उलटले तरी ऑम्लेट व भेळपुरी गाडेधारकांना अद्याप या फूडकोर्टमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले नाही. त्‍यामुळे तेथे बिगरगोमंतकीयांची मात्र निवाऱ्याची उत्तम सोय झालेली आहे.

साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात गाडेधारकांना कधी सामावून घेणार? असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

सदर फूडकोर्टसमोर ऑम्लेट व भेळपुरी विक्री करणारे गाडेधारक आहेत. त्यांना या फूडकोर्टमध्ये लगेच सामावून घेणार असे वाटले होते. पण फूडकोर्ट चालविण्यासाठी कंत्राटदाराची गरज असून कुडचडे पालिका त्‍याच्‍या शोधात आहे.

Curchorem Food Court
Ponda : प्रभाग 8 अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

तोपर्यंत तरी हा फूडकोर्ट शोभेची बाहुली बनून राहणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर फूडकोर्टचा ताबा घेण्यासाठी कंत्राटदार उत्सुक नसल्याने कुडचडे पालिकेपुढे मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

एप्रिल महिन्यात फूडकोर्ट सुरू होणार असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. फूडकोर्ट कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फूडकोर्टमध्ये गाडेधारकांना समावून घेण्यापूर्वीच त्‍याचे घाईगडबडीत उद्‌घाटन करण्यात आले. 1 एप्रिल रोजी खऱ्या अर्थाने फूडकोर्ट सुरू होणार असे आश्‍‍वासन देण्यात आले होते. पण आता 18 तारीख उलटून गेली तरी फूडकोर्ट सुरू झालेला नाही.

साडेपाच कोटी रुपये खर्च करून पर्यटन खात्याकडून उभारण्यात आलेला हा फूडकोर्ट पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्‍यामुळे कुडचडेत हा प्रकल्‍प ‘पांढरा हत्ती’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Curchorem Food Court
Mapusa News: म्हापशात आरोग्य केंद्राची विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना, शहर होणार मलेरियामुक्त

म्‍हणून नगरपालिकेला मिळेना कंत्राटदार

मिळालेल्‍या माहितीनुसार, पालिकेने फूडकोर्टचे दर जास्त ठेवल्यामुळे तो चालविण्यासाठी अजून एकही कंत्राटदार मिळालेला नाही. त्यामुळे 8 फेब्रुवारी रोजी उद्‌घाटन होऊन आता अडीच महिने पूर्ण होत आले तरीही हा प्रकल्‍प तसाच धूळ खात पडून आहे.

फेब्रुवारीत प्रकल्पाच ताबा कुडचडे-काकोडा पालिकेकडे देण्यापूर्वीच या प्रकल्पाचे धूमधडाक्यात उद्‌घाटन करण्यात आले होते.

सध्या कुडचडेच्या पार्किंगच्या जागेत ऑम्लेट-पाव आणि भेळपुरीची विक्री करणाऱ्या सुमारे 13 गाडेधारकांबरोबरच एकूण 33 जणांना या फूडकोर्टमध्‍ये स्थलांतरित केले जाणार होते. परंतु उद्‌घाटन होऊन अडीच महिने उलटले तरी तेथे शुकशुकाट पसरला आहे.

प्रकल्‍प बिगरगोमंतकीयांसाठी आश्रयस्‍थान

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल आणि पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी या फूडकोर्ट प्रकल्पाचे थाटात उद्‌घाटन केले होते.

हा प्रकल्प काही स्थानिक खाद्यविक्रेत्यांच्या कामी आला नाही, पण त्यात रविवारचा खास बाजार मात्र भरू लागला आहे. विक्रेते त्यात कपडे विकू लागले आहेत. दुसरीकडे परप्रांतीयांसाठी विश्रांती घेण्याची जागा बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com