"इस्राईलमध्ये लोकं बीफ खातात, मूर्तीपूजा मानत नाहीत" वादग्रस्त कमेंटने दुखावल्या हिंदूंच्या भावना; साखळीत एकला अटक

Hindu sentiments hurt Sankhali: साखळीतील एका स्थानिकाने केलेल्या कमेंटमुळे सर्वांनी संताप व्यक्त केला आहे, ही कमेंट नेमकी काय होती जाणून घेऊया.
Goa beef remark protest
Goa beef remark protestDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावग्रस्त स्थिति निर्माण झाली होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर नावाची मोहीम राबवली. यामध्ये भारतीय सेनेने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलं जातंय, मात्र मंगळवारी (दि.१३) रोजी साखळीतील एका स्थानिकाने केलेल्या कमेंटमुळे सर्वांनी संताप व्यक्त केला जात आहे, ही कमेंट नेमकी काय होती जाणून घेऊया.

मला इस्राईलआवडतं कारण..

शेहझाद शेख नावाच्या या इसमाने सोशल मिडियावरील एका पोस्टवर त्याला इस्राईलमध्ये लोकं गायीचं मांस खात असल्याने आणि मूर्ती पूजा मनात नसल्याने आवडत असल्याचं मत मांडलं होतं. भारतात मूर्ती पूजेला भरपूर महत्व आहे, तसंच गाईला हिंदू समाजात आदराचं स्थान दिलं जातं.

Goa beef remark protest
Operation Sindoor: भारताचा निर्णायक प्रहार! पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत शस्त्रविरामासाठी गुडघे टेकण्यास पाडलं भाग

शेहझाद शेखच्या या कमेंटमुळे हिंदू समाजाच्या भवना दुखावल्या गेल्याने त्यांनी डिचोली पोलिस स्थानकात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली शेहझाद शेखच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.

पोलिसांकडून अटक:

साखळीतील शहजाद नावाच्या स्थानिकाने केलेल्या या कमेंटमुळे स्थानिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात आणि म्हणूनच स्थानिक हिंदू समाजाकडून त्याला अटक केली जावी अशी मागणी केली जात होती. पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आणि बुधवारी (दि.१४) रोजी साखळीतील नागरिकांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर शेहझाद याला अटक करण्यात आली आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी साखळीतील युवकांनी केली.

साखळी नगरपालिकेच्या अध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी देखील घडलेल्या प्रसंगावर खेद व्यक्त केला होता. साखळीतील एका जीमचा मालक असून देखील खाण्याबद्दल अशी कमेंट केलेला हा माणूस भारताचा अनादर करतोय, एवढा द्वेष का असावा? असं त्या म्हणाल्या आहेत. भारतात राहून, भारतीयांकडून पैसे कमावत असलेल्या या देशद्रोही लोकांचा मी निषेध करते असं म्हणत त्यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com