Indian army decisive operation
Indian army decisive operationDainik Gomantak

Operation Sindoor: भारताचा निर्णायक प्रहार! पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत शस्त्रविरामासाठी गुडघे टेकण्यास पाडलं भाग

India destroys terror camps: या हल्ल्यात दहशतवादी कृत्य करणारेच नव्हे, तर त्यांना आश्रय देणारे आणि फूस लावणारे म्होरकेही संपवायचे असा उद्देश ठेऊन भारताने ही मोहीम राबवली होती
Published on

नवी दिल्ली: पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जगाला स्पष्ट संकेत दिले की या वेळी पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. भारताने राबवलेल्या ओपेरेशन सिंदूरमने दहशतवादाच्या प्रमुख सूत्रधारांवर निशाणा साधलाय. या हल्ल्यात दहशतवादी कृत्य करणारेच नव्हे, तर त्यांना आश्रय देणारे आणि फूस लावणारे म्होरकेही संपवायचे असा उद्देश ठेऊन भारताने ही मोहीम राबवली होती.

भारतीय सशस्त्र दलांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून, कोणतीही चूक न करता 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पार पाडले. या ऑपरेशनमुळे पाकिस्तानची युद्ध करण्याची मानसिकता पूर्णपणे मोडून पडलीये. पाकिस्तान केवळ काही तासांतच कूटनीतिकदृष्ट्या एकाकी पडला, लष्करीदृष्ट्या कमजोर झाला आणि त्याला त्वरित शस्त्रविरामाची मागणी करावी लागली.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. या युद्धजन्य स्थितीत ९ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतातील २६ ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती, ज्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी १० मे च्या सकाळी भारताने ९० मिनिटांचे हवाई अभियान चालवले. यात पाकिस्तानमधील ११ महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आणि भारताचं पारड भारी झालं.

'ऑपरेशन सिंदूर' निर्णायक हल्ला:

भारताच्या आक्रमक अभियानाचा महत्वाचा टप्पा म्हणजेच 'ऑपरेशन सिंदूर'. हा हल्ला बरोबर दुपारी १:०४ वाजता सुरू झाला. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.

Indian army decisive operation
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ची धग पाक सैन्याच्या मुख्यालयापर्यंत! ब्राह्मोसच्या शौर्याची झलक दिसली; राजनाथ सिंहांचे प्रतिपादन

यामध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी तळ होते, जे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्याब यांसारख्या संघटनांचे मुख्यालय मानले जातात.

या संघटना गेल्या तीन दशकांपासून भारतीय भूमीवर झालेल्या काही सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. निवडलेल्या नऊ ठिकाणांपैकी प्रत्येक ठिकाण दहशतवादी यंत्रणेतील महत्त्वपूर्ण केंद्र होते. ही केंद्रं घुसखोरी, दहशतवादी प्रशिक्षण आणि भारतावरील हल्ल्यांच्या योजनांसाठी जबाबदार होती. २५ मिनिटांच्या केलेल्या या अचूक हल्ल्याने भारताने तो दहशतवादा विरोधात मोठी कारवाई करू शकतो असा जवाब दिलाय.

पाकिस्तान हवाई दलाची कंबर मोडली:

या ऑपरेशनमधील प्राथमिक लक्ष्यांमध्ये पाकिस्तान हवाई दलाच्या काही सर्वात महत्त्वाच्या आस्थापनांचा समावेश होता. रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या जनरल मुख्यालयाच्या जवळ असलेलं लष्करी व्हीआयपी वाहतुकीचे केंद्र होतं. याचबरोबर सरगोधामधील मुशफ बेस हे पाकिस्तानच्या अणु बॉम्ब वाहून नेणाऱ्या विमानांचे नियंत्रण केंद्र आणि एलिट कॉम्बॅट कमांडर्स स्कूलचं घर होतं. इथे भारताने केलेल्या हल्ल्याने पाकिस्तान हवाई दलाला गोंधळात पाडलं आणि ते दिशाहीन झाले.

सोबतच रफीकी, मुरीद, सियालकोट, स्कार्दू, जैकबाबाद, सुक्कुर, पसरूर, चुनियन आणि भोलारी ही ठिकाणे एकत्रितपणे पाकिस्तानच्या एफ-१६, जेएफ-१७ थंडर, मिराज आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध युनिट्सचे तळं होती. भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या स्क्वाड्रन, ड्रोन तळ, रडार नेटवर्क आणि युद्ध-सज्ज विमाने निष्प्रभ झाली, ज्यामुळे एका रात्रीत पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली.

भारताच्या शस्त्रागारातील गेम-चेंजर

भारताच्या लष्करी शस्त्रागारात एक शक्तिशाली आणि नवीन आयाम जोडणारा 'आकाश तीर' ही एक क्रांतिकारी रिअल-टाइम एअर डिफेन्स सिस्टीम आहे. भारताच्या डीआरडीओ, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून विकसित आणि इस्रो सोबत एकत्रित केलेली ही प्रणाली अभूतपूर्व हवाई क्षेत्र नियंत्रण आणि अचूक हल्ल्यांसाठी NAVIC-आधारित अचूक मार्गदर्शन, उपग्रह-लिंक्ड स्वायत्तता आणि स्टेल्थ ड्रोनचे संयोजन आहे. 'आकाश तीर'मुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, ज्यामुळे शत्रूंना भारतीय आकाशात प्रवेश कारणं देखील मुश्किल होतं.

भारतीय लष्कराने केलेली 'ऑपरेशन सिंदूर' केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला एक कठोर आणि स्पष्ट संदेश होता की भारत आता कोणत्याही प्रकारची आगळीक सहन करणार नाही आणि भरताजवळ थेट त्यांच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला शस्त्रविरामाची याचना करावी लागली, हे भारताच्या कणखर भूमिकेचं आणि यशस्वी लष्करी योजनेचे प्रतीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com