Margao Dengue  Cases
Margao Dengue CasesDainik Gomantak

Margao Dengue Cases: मडगावात डेंग्यूची प्रकरणे; नागरिकांना सतर्कतेचा इशारा...

बदलत्या वातावरणामुळे अनेकजण आजारी
Published on

Dengue Patients Increasing in Margao: पावसाळ्यात राज्यभर डेंग्यूच्या रुग्णांची वाढ झाली. यानंतर हळूहळू रुगणसंख्या ओसरू लागली. आता हिवाळ्यात मडगावात पुन्हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Margao Dengue  Cases
Goa News 07 January 2024: मिशन लोकसभा, काँग्रेसने शिलेदार नेमले

उपलब्ध माहितीनुसार, यामध्ये डेंग्यूची लक्षणे असलेले आतापर्यंत 24 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांना डेंग्यू झाल्याचे समोर आले. बदलत्या वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत आहेत.

त्यातच ताप आलेल्या अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून येत आहेत. ही एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत फक्त दोनच रुग्ण आढळल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती मडगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी सुकारो क्वाद्रोस यांनी दिली.

ही रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. घराच्या आजूबाजूला जर कुठेही पाणी साचले असेल तर डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी ते नष्ट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com