Dengue
Dengue Dainik Gomantak

म्हापशात डेंग्यूचा फैलाव ; आरोग्य यंत्रणा सक्रिय

म्हापशाच्या कुचेली, करासवाडा, गावसावाडा, पेडे आणि शेळपे या भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.
Published on

म्हापसा : मागील महिन्याभरात म्हापसा शहरात डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी म्हापसा नागरी आरोग्य केंद्र दक्ष झाले आहे. साखळी, फोंडा नंतर म्हापशात रुग्ण आढळून लागल्याने राज्यात डेंग्यूचा फैलाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

Dengue
गोव्यातील वीज दरवाढीमुळे नागरिक त्रस्त

म्हापशाच्या कुचेली, करासवाडा, गावसावाडा, पेडे व शेळपे या भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. येथील आरोग्य अधिकारी प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेत आहेत. स्वच्छता उपक्रम राबवणे, घरोघरी जनजागृती करणे, प्रतिबंध करण्यासाठी काय करावे , याविषयी माहिती पत्रकांचे वाटप, असे उपक्रम राबवले जात आहेत.

गेल्या महिनाभराच्या काळात सात रुग्ण सापडले असून त्याला अटकाव करण्यासाठी आम्ही नियमितपणे मोहीम राबवली आहे, असे डॉ. डिसोझा यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com