सां जुझे द आरियल भागात डेंग्यूचं थैमान; नागरिकांमध्ये घबराट

कचऱ्याचे साम्राज्य ; पावसाळापूर्ण कामे अद्याप नाही
Dengue patients in Goa
Dengue patients in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सां जुझे द आरियल भागात कामगार व मजुरांमध्ये डेंग्यूची प्रकरणे वाढत असल्याने या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथील एका तलावात दूषित पाणी आढळले आहे. तसेच पावसाळापूर्व कामे न झाल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय या भागात भंगार अड्डे असल्यानेही डेंग्यू पसरण्याची भीती वाढली आहे. (Dengue fever in san juje da areal area; Panic among citizens )

पावसाळापूर्व कामांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली, पण कामासाठी अजून निविदा काढलेली नाही, अशी माहिती उघड झाली आहे. वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, पंचायत सदस्य, आरोग्य खात्याचे कर्मचारी तसेच आयडीसी अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. पाहणीत भंगार अड्ड्यांचा प्रश्र्न उपस्थित झाला. आणि यामुळे डेंग्यूची प्रकरणे वाढीस लागल्याचा अंदाज आहे. भंगार अड्ड्याच्या मालकांनी कसलीही वस्तू शेडच्या बाहेर ठेवू नये, ठेवली तर दंडात्मक कारवाई करावी लागेल असे सांगण्यात आले.

Dengue patients in Goa
Photo : गोव्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना गती

सरपंच एलिस्टन फर्नांडिस यांनी सांगितले, की लोकांना भंगार अड्ड्याची जास्त भीती आहे. आमदार सिल्वा यांनी या भागात कायदेशीर व बेकायदेशीर भंगार अड्ड्यांची माहिती मागितली आहे. क्रूझ सिल्वा यांनी सांगितले, की नेसाय औद्योगिक वसाहतीमध्ये सहा भंगारअड्डे सापडले आहेत. काहीजणांनी रस्त्याच्या बाजूला भंगार वस्तू टाकल्या आहेत. ही गंभीर बाब आहे व त्यावर तत्काळ उपाय काढणे आवश्यक आहे. रस्त्यावरील भंगार वस्तू काढून जागा स्वच्छ करण्यासाठी भंगारअड्डे मालकांना १५ दिवसांची मुदत दिल्याचे आमदारांनी सांगितले.

Dengue patients in Goa
लोबोंसह काँग्रेसचे 6 आमदार लवकरच होणार भाजपवासी!

‘तलावातील दूषित पाण्याची चौकशी करा’

सां जुझे द आरियल नागरिक युनियनने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून तलावात सापडलेल्या दूषित पाण्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या भागातील औद्योगीक परिसरातील कारखाने व कंपन्या प्रदूषित पाणी या तलावात सोडत आहेत असा संशय युनियनचे अध्यक्ष फ्रेडी त्रावासो यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com