लोबोंसह काँग्रेसचे 6 आमदार लवकरच होणार भाजपवासी!

Michael Lobo Goa : पणजीत गुप्‍त बैठक ; भाजप हायकमांडकडून मात्र अजून हिरवा कंदील नाही
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

Michael Lobo Goa : नगरनियोजन खात्‍याच्‍या कारवाईमुळे अस्‍वस्‍थ झालेले विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काँग्रेसमधील काही आमदारांसमवेत येथील एका हॉटेलमध्‍ये गुप्‍त बैठक घेतल्‍याची माहिती आहे. हे आमदार लोबोंसमवेत भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍यास इच्‍छुक असून तसे प्रयत्‍न त्‍यांनी सुरू केले आहेत. मात्र अद्याप भाजप हायकमांडकडून त्‍यास हिरवा कंदील दाखविण्‍यात आलेला नाही.

Michael Lobo
साळगाव : रुग्णवाहिका चालकाची सासरवाडीत आत्महत्या

विधानसभा निवडणुकीमध्‍ये पुरेस बहुमत मिळवू न शकलेल्‍या आणि सत्तेपासून वंचित राहिलेल्‍या काँग्रेस आमदारांमधील अस्‍वस्‍थता आता वाढीस लागली आहे. अशातच नगरनियोजन खात्‍याने विविध ठिकाणी केलेल्‍या जमीन रुपांतराचा मुद्दा पुढे करून कारवाईचे जाहीर संकेत दिले आहेत.

नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी यातील काही भाग उद्या सोमवारी जाहीर करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यात राणे यांचे टार्गेट लोबो हेच असल्‍याने स्‍वत: लोबो प्रचंड अस्‍वस्‍थ आहेत. यासाठीच त्‍यांनी पक्षातील अन्‍य सहा आमदारांसमवेत बैठक घेऊन नगरनियोजन खात्‍याची सुरू असलेल्‍या कारवाईबाबत सविस्‍तर चर्चा केल्‍याचे समजते.

या बैठकीचे नेतृत्‍व खुद्द लोबो यांनी केले असून ते स्‍वत: आणि पक्षातील इतर आमदारांना भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍यास इच्‍छुक असल्‍याचा असा कयास आहे.

सी. टी. रवींच्‍या वक्तव्‍याला पुष्‍टी

भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी भाजपच्‍या आमदारांची संख्‍या लवकरच 30 होईल असे जाहीर केले होते. त्‍यांच्‍या या वक्तव्‍याला आज झालेल्‍या बैठकीमुळे पुष्‍टी मिळाली आहे. शिवाय मंत्री राणे यांनी आपल्‍याला अनेकजण फोन करीत असून, आपण ते फोन घेत नाहीत असे वक्तव्‍य केले होते. यावरून काँग्रेसमध्‍ये अवस्‍थता वाढल्‍याच्‍या गोष्‍टीला दुजोरा मिळतोय.

‘ते’ सहा आमदार कोण?

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्‍या आणि आता भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी उत्‍सुक असलेले ‘ते’ सहा आमदार कोण, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या संभाव्‍य फुटीर दलाचे नेतृत्‍व मूळ भाजपचे असलेले दस्‍तुरखुद्द विरोधी पक्षनेते मायकल लोबो असतील अशी चर्चा सुरू आहे. मागील विधानसभेतील विरोधी पक्षनेत्‍यांनी अशाच प्रकारचा कित्ता गिरविला होता. त्‍याची पुनरावृत्ती होईल का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com