Dona Paula Jetty: दोनापावला जेटी बनतेय ‘पार्टी डेस्टिनेशन’

Dona Paula: कंत्राटदार कंपनीकडे हक्क : महसूलप्राप्तीसाठी पर्यटन खात्याने उचललेय पाऊल
Dona Paula Jetty
Dona Paula JettyDainik Gomantak

विलास ओहाळ

Dona Paula Jetty: पर्यटकांसाठी खुली झालेली दोनापावला येथील प्रसिद्ध जेटी आता ‘पार्टी डेस्टिनेशन’ म्हणून ओळख निर्माण करू लागली आहे. या ठिकाणी सायंकाळनंतर पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

जेटीवर जाण्यासाठी तिकीट आकारणाऱ्या कंपनीमार्फतच या पार्ट्यांना परवानगी दिली जातेय. त्यातून पर्यटन खात्याला चांगली महसूल प्राप्ती होऊ लागली आहे.

Dona Paula Jetty
Goa Panchayat: पंचायत संचालनालयात खटले तुंबले

दुरुस्‍ती आणि नूतनीकरणाच्‍या नावाखाली दोनापावला जेटी गेल्‍या चार वर्षांपासून बंद होती. त्यानंतर त्या जेटीचे काम कधी पूर्ण होऊन ती कधी खुली होईल, याबाबत उत्सुकता होती.

अखेर अलीकडेच ती पर्यटकांसाठी खुली करण्‍यात आली. मात्रप जेटी खुली करताना तेथे पर्यटन खाते पर्यटकांसाठी तिकीट आकारत आहे.

दरम्‍यान, यापूर्वी राज्य सरकारने वेरे येथील रेईशमागूस किल्ल्यावरील जागा एका हॉटेल व्यवस्थापनाकडे दिली आहे. सरकारच्‍या या निर्णयाला त्‍यावेळी जोरदार विरोध झाला होता. मात्र दोनापावला जेटीवर सायंकाळपर्यंत म्हणजेच सूर्यास्तापर्यंतच गर्दी असते.

रात्रीच्‍या वेळी जेटीचे सौंदर्य आणखी खुलते

दोनापावला जेटीचा परिसर रात्रीच्‍या वेळी लक्ष वेधून घेतो. त्‍यामुळेच समुद्राच्या पाण्यात असलेल्या या टेकडीवर पार्टी आयोजित करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. पार्ट्यांसाठी ही जेटी सुशोभित केली जाते.

विद्युत रोषणाई, फुलांनी सजविली जाते. त्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या काम करत असल्याची माहिती हाती आली आहे.

दोनापावला जेटीवर सायंकाळपर्यंत म्हणजेच सूर्यास्तापर्यंतच गर्दी असते. त्यानंतर जेटी मोकळी असते. साहजिकच रात्रीच्‍या वेळी तेथे पार्ट्यांचे आयोजन करण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यासाठी नियुक्त करण्‍यात आलेल्‍या कंपनीकडून वर्षाकाठी सरकारला महसूल मिळणार आहे. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com