Sangolda: सांगोल्डा कोमुनिदाद जागेतील 22 बांधकामांवर हातोडा; घटनास्थळी तणाव, पोलिस बंदोबस्त, तिघेजण ताब्यात

Sangolda Illegal Structure Demolition: बांधकाम हटविण्यासाठी विरोध करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sangolda Illegal Structure Demolition
Sangolda Illegal Structure DemolitionDainik Gomantak

Sangolda Illegal Structure Demolition

सांगोल्डा कोमुनिदाद जागेतील 22 बांधकाम हटविण्याचे काम सध्या पोलिस बंदोबस्तात सुरु झाले आहे. बांधकाम हटविण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता बांधकाम धारकांनी कारवाईला विरोध केला, यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

बांधकाम हटविण्यासाठी विरोध करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sangolda Illegal Structure Demolition
Sangolda Illegal Structure DemolitionDainik Gomantak

सांगोल्डामधील कोमुनिदाद जागेतील 22 बांधकाम हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते. आस्थापना धारकांनी यासाठी मुदतवाढ देण्याची याचिका दाखल केली होती. मुदतवाढीची याचिका वारंवार दाखल केली जात असल्याने खंडपीठाकडून ती फेटाळण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली. आस्थापना धारकांनी कारवाईला विरोध केला.

Sangolda Illegal Structure Demolition
Smart City Panaji: रायबंदरवासीयांची घुसमट कधी थांबणार? खोदकाम सुरूच

आक्रोश, विरोध आणि तणाव

कारवाईसाठी अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल होताच संबधित घरातील रहिवाशांनी एकच आक्रोश करत कारवाईला विरोध केला. घर तोडल्यास आम्ही जाणार कुठे? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यावेळी घरातील महिला, लहान मुलांनी एकच आक्रोश केला.

पाणी, वीज जोडणी कशी दिली?

घरे बेकायदेशीर आहे तर मग घरांसाठी पाणी तसेच, वीज जोडणी कशी दिली असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला. तर, काहीजणांनी आमचा तसेच, आमचा मुलांचा देखील येथेच जन्म झाला आणि आता या घरांना बेकायदेशीर कसे ठरवले असेही स्थानिक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com