Smart City Panaji: रायबंदरवासीयांची घुसमट कधी थांबणार? खोदकाम सुरूच

Smart City Panaji Ribandar: पूर्ततेसाठी जून उजाडण्याची शक्यता, दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी
Smart City Panaji
Smart City PanajiDainik Gomantak

Smart City Panaji

इमेजिन पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे गेल्या महिनाभर रायबंदरवासीय त्रस्त आहेत.

१० मार्चपासून जुने गोवे बासिलिका चर्च ते रायबंदरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु हे काम जूनपर्यंत पुढे रेटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

Smart City Panaji
Goa's Daily News Wrap: गोव्यातील क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून विठ्ठल मंदिर आणि आजुदा चर्च या टप्प्यात हे काम सुरू आहे. ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली असली तरी ही शक्यता कमीच दिसते. अजूनही मोठ्या प्रमाणात काम बाकी आहे, त्यात नदी आणि झऱ्यांच्या पाण्यामुळे कामात अडथळे येत असल्याने काम मंद गती पुढे जात आहे. खोदलेले रस्ते आणि धूळ यामुळे स्थानिकांना जगणे कठिण होत चालले आहे.

वाहतूक कदंब महामार्गावरून वळवली असली तरी चिंबल नाक्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथे सतत वाहतूक कोंडी होत असते. दोन्ही बाजूने रस्त्यांची कामे सुरू असल्याने रायबंदरवासीयांची घुसमट चालली आहे. त्यात प्रशासनाकडून पारदर्शक माहिती दिली जात नसल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.

स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता

रस्त्याचे खोदकाम होत असल्याने लोकांना आपली वाहने अन्यत्र कुठे तरी ठेवून चालत घरी जाण्याची वेळ आली आहे. तसेच दर दिवशी धुळीचा मारा सहन करावा लागतो. त्यात काम जूनपर्यंत रेटण्याची शक्यता निर्माण झाल्याने पावसाळ्यात स्थिती आणखी गंभीर होण्याच्या दिशेने काम जात आहे.

गेला महिनाभर आम्ही धूळ खात आहोत. त्यात माझी तसेच अन्य काहीजणांची प्रकृती बिघडली आहे. स्मार्ट सिटीचे काम हे नियोजनबद्ध पद्धतीने होण्याची गरज होती, परंतु पैशांची उधळपट्टी होताना दिसते. आमच्या घरी दुचाकीदेखील नेता येत नाही. उद्या आपत्कालीन स्थिती रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दल कसे काय पोहोचणार? सत्ताधारी पक्षात असल्याने नगरसेवक केवळ आश्वासने देत आहेत.

- जुझे परेरा, रहिवासी, रायबंदर

रायबंदर येथे सांडपाणी व्यवस्था नसल्याने गटारांत वा नदीत सांडपाणी सोडले जात होते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे हाती घेताना आम्हाला त्रास व्हायचा. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही ही कामे हाती घेतली असून लोकांनी थोडी गैरसोय सहन करावी. या कामाचा फायदा सर्वांना होणार आहे. तसेच हे काम ३० एप्रिलपर्यंतच चालणार आहे.

विठ्ठल चोपडेकर, नगरसेवक

विकास व्हायला हवा असेल तर थोडी कळ सोसण्याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची आवश्यकता होती. वाहतूक व्यवस्था कदंब पठारावरून केली असतानाही काहीजण शॉर्टकट घेण्याच्या नादात चिंबल नाक्यावरून रायबंदरला येतात आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात. यासाठी गावातील लोकांनी स्वयंसेवा करून पोलिसांना मदत करणे अपेक्षित आहे.

- शैलेश साळगावकर, रहिवासी, रायबंदर

स्मार्ट सिटीचे काम सुरळीत चालत होते, परंतु कंत्राटदाराने काही ठिकाणी जोडणी देण्यास चूक केल्याने ते पुढे रेटले आहे. आमच्या प्रभागात काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल, परंतु नदीकाठी असलेल्या ठिकाणी आणखी विलंब होऊ शकतो.

सिल्वेस्टर फर्नांडिस, स्थानिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com