Mining Business : ‘गोवा फाऊंडेशन’च्या सोबतीनेच तिढा सोडवा! काब्राल

Goa Mining Business : ‘ खाण, रेती व्यवसाय तातडीने सुरू करण्याची मागणी
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024
Nilesh Cabral in Goa Assembly Monsoon SessionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, राज्यातील खाण व्यवसाय बंद होऊन १२ वर्षे उलटून गेली, तरी तो अजून सुरू झालेला नाही. रेती व्यवसायही बंद आहे. त्यामुळे या दोन्ही व्यवसायावर अवलंबून असलेल्या विविध घटकाच्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.

रेतीचे दर आवाक्याबाहेर गेल्याने सामान्य लोकांना घराचे बांधकाम करणेही परवडणारे नाही, त्यामुळे सरकारने रेती व खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. खाण व्यवसाय सुरू करण्यामध्ये वेळोवेळी खाण धोरणात त्रुटी दाखवून न्यायालयात जाणाऱ्या ‘गोवा फाऊंडेशन’लाच सोबत घेऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणी आज खाण व शिक्षण खात्याच्या मागण्यांवरील विधानसभेतील चर्चेवेळी आमदार नीलेश काब्राल यांनी केली.

राज्य सरकार खाण धोरण लागू करून हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना गोवा फाऊंडेशन त्यामधील त्रुटी काढून न्यायालयात जात आहे. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी ‘गोवा फाऊंडेशन’च्या क्लॉड आल्वारिस यांनाच सरकारने सोबत घेऊन हे खाण धोरण लागू करावे, असे काब्राल म्हणाले. रेती व्यवसाय लवकर सुरू होण्याची गरज आहे. बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले आहे.

नव्या शैक्षणिक धोरण लागू करताना शाळांमध्ये असलेल्या रिक्त शिक्षकांच्या जागांमुळे अडचणी येत असल्याने त्या लगेच कायमस्वरुपी भरण्यात याव्यात. अजून काही प्राथमिक व माध्यमिक शाळाना शिक्षण खात्याकडून निधी दिला गेलेला नाही. बालरथ बसेस जुन्या झालेल्या आहेत, ते जुने बालरथ बसेस बदलाव्यात, अशी मागणी आमदार डिलायला लोबो यांनी केली.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024
Goa Assembly Session: ‘गृहनिर्माण’च्या जीर्ण इमारतीच्या फेरबांधणीस देणार मदत; मंत्री ढवळीकर

रेतीअभावी अडली बांधकामे! गोव्याबाहेरून रेती आणण्यासाठी दामदुप्पट किंमत मोजावी लागते. त्यामुळे राज्यात बेकायदा रेती उत्खनन केले जाते. सामान्यांना ही रेती मिळणे मुष्किलीचे बनले असल्याने बांधकामे अडली आहेत. त्यामुळे यासंदर्भात सरकारने गंभीरतेने विचार करून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती आमदार डिलायला लोबो व आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com