Marathi Official Language: कोकणीबरोबरच मराठीला राजभाषा करा! 'राजभाषा निर्धार'ची मागणी; मंत्री रमेश तवडकर यांना निवेदन

Rajbhasha Nirdhar demand: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या एका शिष्टमंडळाने , राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर व प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वात रमेश तवडकर यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सुपूर्द केले.
Marathi Official Language
Marathi Official LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या एका शिष्टमंडळाने , राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर व प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वात क्रीडामंत्री रमेश तवडकर यांची भेट घेऊन, कोकणीबरोबरच मराठी राजभाषा करावी, या मागणीचे निवेदन त्यांना सुपूर्द केले.

शिष्टमंडळात केंद्रीय मार्गदर्शक समितीचे गोविंद देव, कोषाध्यक्ष सूर्यकांत गावस, माजी महापौर अशोक नाईक, राज्य मातृशक्तीप्रमुख डाॅ. अनीता तिळवे, कार्यालय प्रमुख सुरेश डिचोलकर, शाणुदास सावंत व हरिश्चंद्र नाईक होते.

१९87 मध्ये ऐनवेळी ‘व्हीप’ बजावून काँग्रेस आमदारांना, सरकारला हवे तसे मतदान करण्यास भाग पाडण्यात आले व आजचा, मराठीला दुय्यम लेखणारा कायदा संमत झाला, ही पार्श्वभूमी सांगण्यात आली. आपण सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू, असे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

Marathi Official Language
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

विविध क्षेत्रांत मराठीचा वापर

शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मराठी-समर्थन-ठराव करणाऱ्या ग्रामपंचायती,नगरपालिका, ब्लाॅक्सची संख्या, सर्व वृत्तपत्रे, बहुसंख्य जनतेच्या पत्रलेखनाची भाषा मराठी, संस्था, मंदिरे, सहकारी संस्था तसेच सरकारी दफ्तर यातील केवळ मराठीचा वापर वगैरे गोष्टी मंत्री रमेश तवडकर यांच्या लक्षात सरकारी आकडेवारीसह आणून देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry
Subhash Velingkar Marathi Language Goa
Esakal No. 1 Marathi Website
Marathi Official Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com