Goa News : आम्हाला घरी पाठवू नका; संजीवनी कामगारांचे आर्जव

प्रशासकांकडून वर्गवारी : सरकार घेणार पुढील निर्णय
sanjivani sugar factory
sanjivani sugar factoryGomantak Digital Team
Published on
Updated on

संजीवनीच्या कामगारांना स्वेच्छा निवृत्ती लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कामगारांत खळबळ उडाली आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम केले, आता आम्हाला घरी पाठवून आमच्या रोजीरोटीवर टाच आणू नका, अशी विनंती या कामगारांनी केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजीवनीचे प्रशासक सतेज कामत यांनी सर्व कामगारांची वर्गवारी तयार केली असून कोण किती सक्षम आहे आणि कोण किती काम करू शकतो, अशी वर्गवारी करताना त्यांचे वय आणि इतर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. कंत्राटी कामगारांनाही त्यांच्या कंत्राटानुसारच काम मिळणार आहे, त्यामुळे सर्व कामगारांची सूची तयार करण्यात आली आहे.

sanjivani sugar factory
Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

संजीवनी साखर कारखान्यात ऊस गाळप बंद झाल्यानंतर हा कारखाना कसा चालवायचा, हा प्रश्‍न सरकारसमोर उभा होता. मात्र, या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभारण्यासंबंधी विचार झाला आणि त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली. पावसाळ्यानंतर या ठिकाणी खासगी कंपनीतर्फे इथेनॉल प्रकल्प येणार असून त्याची पूर्वतयारी झाली आहे, त्यामुळे या इथेनॉल प्रकल्पात कुणाला कामावर घ्यायचे आणि कुणाला नाही हे नंतर ही कंपनीच ठरवणार आहे.

sanjivani sugar factory
Goa Vehicle Scrapping Policy : जुनी वाहने ‘स्क्रॅप’ला ट्रकमालकांचा विरोध; काय आहे कारण?

संजीवनी साखर कारखान्याचा प्रशासक म्हणून सरकारच्या आदेशानुसार मी सर्व कामगारांची सूची व माहिती तयार केली आहे. कायमस्वरूपी कामगार किती सक्षम आहेत तसेच कंत्राटी कामगारांचे कंत्राट किती आहे, यासंबंधीची माहिती तयार करण्यात आली असून स्वेच्छा निवृत्तीवेळी कुणाला कामावर घ्यायचे आणि कुणाला नाही, यासंंबंधीचा निर्णय सरकार घेणार आहे. २००४ मध्ये जेव्हा तत्कालीन सरकारने स्वेच्छा निवृत्ती लागू केली, त्यावेळेला सक्षम आणि प्रामाणिक कामगारच कारखाना सोडून गेले, ते कामगार आज असते तर संजीवनीची ही अवस्था झाली नसती.

सतेज कामत, प्रशासक, संजीवनी साखर कारखाना

sanjivani sugar factory
Panaji Awareness : गोवा मल्टीफॅकल्टी महाविद्यालयाचा जागृती उपक्रम ; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांनी या कारखान्यात आपले आयुष्य घालवले; पण त्यांना सरकार आज स्वेच्छा निवृत्ती देऊ पाहते आहे. या कामगारांना त्यांच्या वयानुसार निवृत्त होऊ द्या. कुणाच्या पोटावर पाय देणे ठीक नव्हे. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा.

विनायक गावस, सरपंच, धारबांदोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com