Panaji Awareness : गोवा मल्टीफॅकल्टी महाविद्यालयाचा जागृती उपक्रम ; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन : गोवा मल्टीफॅकल्टी महाविद्यालयाचा उपक्रम
Goa Multifaculty College
Goa Multifaculty CollegeGomantak Digital Team

पणजी : गोवा मल्टीफॅकल्टी महाविद्यालय, धारबांदोडा यांच्यातर्फे नुकतेच तालुक्यातील नागरिकांसाठी दोन जागृती कार्यक्रमांचे आयोजन संजिवनी साखर कारखान्याच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाला आदिवासी कल्याण खाते व समाज कल्याण खाते यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य शेख महंमद उस्मानी यांनी स्थानिक लोकांच्या विकास आणि प्रगती यासाठी संस्थेची संसाधने उपलब्ध करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली. दोन्ही सरकारी खात्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी या खात्यांची प्रशंसा केली.

Goa Multifaculty College
Panaji Session Court : गोमंतक भंडारी समाज पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमीन हस्तांतर घोळप्रकरणी गुन्हा दाखल

सरकारच्या योजनांबाबत अद्याप लोकांना परिपूर्ण माहिती नसल्याने अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूची कुट्टीकर यांनी केले. समन्वयक म्हणून संध्या जोसेफ व कल्पिता नाईक यांनी जबाबदारी पार पाडली. कल्पिता नाईक यांनी आभार मानले.

योजनांची दिली माहिती

समाज कल्याण खात्याचे प्रेमानंद शेट यांनी एसएसी, ओबीसी आणि एसटी समाजांमधील लोकांसाठी असलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. तसेच या व्यतिरिक्त एकटी महिला, ज्येष्ठ नागरीक, विधवा, शारीरिक अपंग व्यक्ती अशा व्यक्तींसाठी असलेल्या योजनांचीही माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय एससी, एसटी, ओबीसी या समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकणाऱ्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली.

Goa Multifaculty College
Panaji Session Court : गोमंतक भंडारी समाज पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमीन हस्तांतर घोळप्रकरणी गुन्हा दाखल

गटविकासतर्फे मार्गदर्शन

आदिवासी कल्याण खात्याच्या पल्लवी गावडे यांनी विद्यार्थी आणि अनाथ मुले यांना संगणक अभ्यासक्रम आणि वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी आदिवासी कल्याण खात्याचा प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातील गटविकास कार्यालयात मंगळवार ते शुक्रवार या दिवशी उपलब्ध असतो असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com