Deltin Royal Controversy: ''डेल्टिन रॉयलला मांडवीत येऊच देणार नाही'' पाटकर संतापले; 'सुरक्षा ऑडिट' सादर करण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Goa Congress Casino Protest: या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, मांडवी नदीतील सर्व जहाजांच्या सुरक्षितता ऑडिटचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे अल्टिमेटम सरकारला दिले
Goa casino new
Goa casino newDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध मांडवी नदीतील जलवाहतुकीच्या सुरक्षिततेवरून सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुन्या गोव्यातील फेरीला लागलेली आग आणि पर्यटक बोटीला लागलेल्या आगीच्या ताज्या घटनांमुळे प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचे उघड झालं असल्याचा आरोप गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केलाय.

'डेल्टिन रॉयल'ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही!

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, मांडवी नदीतील सर्व जहाजांच्या सुरक्षितता ऑडिटचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे अल्टिमेटम सरकारला दिले आहे.

गोवा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मांडवी नदीतील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, "कोणत्याही परिस्थितीत ११२ मीटर लांबीच्या 'डेल्टिन रॉयल' कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत प्रवेश करू दिला जाणार नाही."

मांडवीत आधीच वाढती वाहतूक आणि अलीकडील आग लागण्याच्या घटना पाहता, इतक्या मोठ्या जहाजाला परवानगी दिल्यास गंभीर सुरक्षा धोके निर्माण होऊ शकतात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

Goa casino new
Goa Congress: भाजपमध्ये गेलेल्यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश नाही! राहुल गांधींचा आदेश; कॅ. विरियातोंनी दिली माहिती

मुख्यमंत्र्यांनी देखील असे प्रकल्प उभे राहणार नसल्याची खात्री दिल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहावं अशी मागणी केलीये.

अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी

सोमवार (दि. २) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अमित पाटकर सरकारला १५ दिवसांत मांडवी नदीतील सर्व जहाजांचे सुरक्षा ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर काँग्रेस यापुढे 'डेल्टिन रॉयल' सारख्या मोठ्या कॅसिनो जहाजांना मांडवी नदीत प्रवेश करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा देखील दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Black And White Podcast With Amit Patkar
Goa Forward Congress Merger Proposal
Goa Congress Core Committee
Mandovi River Sewage Pollution
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com