धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa Assembly Monsoon Session 2025: पेडणे, डिचोली तसेच बार्देश तालुक्यातील कमांड एरियातील जमिनी सरकारने नव्हे, तर शेतकऱ्यांनीच विकल्या, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
Dhargal land casino controversy| Delta casino land allotment Goa
LOP Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना केला. तर, 'डेल्टा'ने या जमिनीवर हॉस्पिटॅलिटी प्रकल्प आणण्याची हमी सरकारला दिल्यामुळेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

पण, याबाबतचा निर्णय कमांड एरिया विकास प्राधिकरणाच्या (काडा) बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी 'काडा'च्या धारगळमधील जमिनीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले.

जलसिंचनाच्या दृष्टीने अशा जमिनींचे संरक्षण करण्याची गरज असताना सरकारने धारगळमधील जमीन डेल्टा कंपनीला केवळ कॅसिनो थाटण्याच्या उद्देशाने दिली आहे. डेल्टाच्या या प्रस्तावाला सरकारने मान्यताही दिलेली आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले.

Dhargal land casino controversy| Delta casino land allotment Goa
Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

जमिनी सरकारने नाही, शेतकऱ्यांनीच विकल्या!

१) पेडणे, डिचोली तसेच बार्देश तालुक्यातील कमांड एरियातील जमिनी सरकारने नव्हे, तर शेतकऱ्यांनीच विकल्या. धारगळमध्ये तशाच पद्धतीने विकण्यात आलेली ३३ हेक्टर जमीन डेल्टा कंपनीने विकत घेतली आणि तेथे प्रकल्पासाठी त्यांनी मान्यता मागितली, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

२) 'काडा' बैठक येत्या १५ ऑगस्टपर्यंत होणार आहे. त्या बैठकीत 'डेल्टा'च्या प्रकल्पावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com