Dempo Vs Viriato: लिंगभेदाबाबत टिप्पणी? दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे, विरियातोंमध्ये वाद का होतोय?

Dempo Vs Viriato: विरियातो यांनी धेंपे यांच्या उमेदवारीबाबत लिंगभेदावरुन वक्तव्य केल्याचा आरोप धेंपे यांनी केला आहे.
Dempo Vs Viriato
Dempo Vs ViriatoDainik Gomantak
Published on
Updated on

Pallavi Dempo Vs Capt. Viriato Fernandes

गोव्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. मोठ्या प्रतिक्षेनंतर काँग्रेसने उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता उमेदवारांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत.

दक्षिण गोव्यात भाजपच्या पल्लवी धेंपे यांच्या विरोधात काँग्रेसकडून कॅप्टन विरियातो फर्नाडिस उमेदवार असतील. दरम्यान, विरियातो यांनी धेंपे यांच्या उमेदवारीबाबत लिंगभेदावरुन वक्तव्य केल्याचा आरोप धेंपे यांनी केला आहे. यावरुन सध्या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात आरोप करताना दिसत आहेत.

कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी केलेले वक्तव्यातून तीव्र लिंगभेद दिसून येतो. महिलांना घरगुती प्रश्नांची जाण नाही असे वक्तव्य केवळ निराजनक नव्हे तर दुर्दैवी देखील आहे. तरीही मी मोदींनी केलेले प्रभावी काम, विकसित भारत 2047 साठीचा त्यांचा दृष्टीकोन आणि दक्षिण गोव्यातील नागरिकांसाठी माझ्या सकारात्मक योजना डोळ्यापुढे ठेऊन मी सकारात्मक प्रचारावर लक्ष केंद्रीत करेन, असे पल्लवी धेंपे म्हणाल्या आहेत.

विरियातो यांनी माझ्याबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी नव्हे तर अज्ञानातून केल्याचे धेंपे म्हणाल्या. पहिली गोष्ट तर ते मला ओळखत नाहीत, दुसरे म्हणजे त्यांनी मी गेल्या वीस वर्षात क्रीडा, शिक्षण, मिडिया आणि सांस्कृतिक केलेल्या समाजकार्याकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप धेंपे यांनी केला.

Dempo Vs Viriato
North Goa : उत्तर गोव्यात भाजपने काय विकास केला? अमित पाटकर

दरम्यान, धेंपे यांच्या यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. धेंपे विरियातो यांच्या कोणत्या वक्यव्याचा उल्लेख करत आहेत, ते सांगावे. याबाबत काही ऑडिओ किंवा व्हिडिओ असल्यास द्यावा, असे काँग्रेसच्या सोशल मिडिया समन्वयक शमिला सिद्धिकी यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्यांनी देखील विरियातो यांनी केलेल्या वक्तव चुकीचे असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com