
जुने गोवे : गोव्यात सुरु असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला व्हॅटिकनच्या धर्मगुरूंनी हजेरी लावली होती. मुख्य बिशप एडगर पेना पर्रा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या एकूण नऊ धर्मगुरूंनी गोव्याने आत्तापर्यंत जपलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या आठवणींची प्रशंसा केली. गोव्यात आजही सेंट झेवियर यांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते हे पाहून धर्मगुरू खुश झाले.
गोव्यातील भेटी दरम्यान आर्चबिशप पर्रा यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शिकवणीनुसार प्रेम आणि एकमेकांना मदत करत सामाजिक संबंध मजबूत करण्यावर भर दिला. कार्डिनल-इलेक्ट बिशप जॉर्ज कूवाकड आणि इतर मान्यवरांचाही समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने विविध धार्मिक समारंभांमध्ये भाग घेतला तसेच गोव्यातील सेंट झेवियर यांच्या संबंधित काही ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.
व्हॅटिकनमधून धर्मगुरूंच्या भेटीमुळे गोवा तसेच परदेशातील संबंध आणखीन मजबूत झाले आहेत. या भेटीमधून सेंट झेवियर यांच्याप्रती देश-विदेशातील भाविकांच्या भक्तीचे किंवा श्रद्धेचं उदाहरण स्पष्ट होतं.
गोयेंचो सायब सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळयाला येणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा सुरळीत व्हावी म्हणून गोवा राज्य सरकारने कदंबा बसेसची आखणी करून दिली होती.
बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार कदंबा महामंडळाकडून आणखीन ३० बसेस आखून देण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.