Full Dmergency Declared At Delhi Airport: दिल्ली विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुबईला जाणाऱ्या FedEx विमानाला उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याने धडक दिली. या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आदींना पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FedEx विमान उड्डाण घेतल्यानंतर एका पक्ष्याला धडकले. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
अशा परिस्थितीत विमानतळ प्रशासनाने संपूर्ण आणीबाणी घोषित केली आहे, जेणेकरुन परिस्थितीला तोंड देता येईल.
तसेच, संपूर्ण आणीबाणीची घोषणा फक्त शनिवारी सकाळी 10 ते 11 पर्यंत होती. सध्या दिल्ली विमानतळावरील (Delhi Airport) परिस्थिती सामान्य आहे.
विशेष म्हणजे, याआधीही अनेकदा पक्ष्यांची टक्कर किंवा अन्य कारणांमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंगच्या घटना घडल्या आहेत.
या वर्षी 4 जानेवारी रोजी दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात हवेतच बिघाड झाल्याने दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
तेव्हा एअर इंडियाने सांगितले होते की, 210 प्रवाशांना घेऊन विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. एअर इंडियाचे B787-800 विमान व्हीटी-आणि दिल्ली ते पॅरिस फ्लाइट AI143 "स्लॅट ड्राईव्ह" स्नॅग समस्येमुळे एअर टर्नबॅकमध्ये गुंतले होते, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्यातच बिघाड आढळून आल्यानंतर विमान परत आणण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.