Santa Cruz Flyover: सांताक्रुझ उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे; कोसळण्याची भीती

Margao Highway Flyover: पुलाच्या दोन्ही बाजूने लावलेल्या फरशा नीट लावल्या गेल्या नसल्याने त्यातून मातीची गळती होऊ लागली आहे
Margao Highway Flyover: पुलाच्या दोन्ही बाजूने लावलेल्या फरशा नीट लावल्या गेल्या नसल्याने त्यातून मातीची गळती होऊ लागली आहे
Santa Cruz FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: मडगाव महामार्गावरील सांताक्रुझ येथील उड्डाणपुलाच्या कामात दोष आढळले असून पुलाच्या दोन्ही बाजूने लावलेल्या फरशा नीट लावल्या गेल्या नसल्याने त्यातून मातीची गळती होऊ लागली आहे. काही ठिकाणी फरशा बाहेर येऊ लागल्याने धोक्याचे संकेत दिसू लागले आहे.

कुजिरा, सांताक्रुझ च्या दिशेने असलेल्या बाजूच्या फरशा बाहेर येऊ लागल्याने त्यातून मातीची गळती होत आहे. उड्डापुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने ही निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फरशा बसवताना अभियंते भौतिकशास्त्राचा वापर करून हे काम करतात, परंतु येथे वापर योग्यरीत्या केलेला नसल्याचे दिसते.

फरश्यांच्या आत माती घालून बंद करण्यासाठी डावीकडून – उजवीकडे बेल्ट घालून बंद केले जाते. या प्रक्रियेला इंटरलॉकिंग असे म्हणतात, मात्र हे करताना बेल्ट तुटले असणार किंवा ते नीट लावलेले नाहीत, परिणामी फरशा बाहेर येऊ लागल्या आहेत.

Margao Highway Flyover: पुलाच्या दोन्ही बाजूने लावलेल्या फरशा नीट लावल्या गेल्या नसल्याने त्यातून मातीची गळती होऊ लागली आहे
Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

आणखी एक चिंताजनक निरीक्षण उड्डाणपुलाच्या भिंतीवर नोंद झाले की, छोटी रोपटी आलेली दिसतात. इंटरलॉकिंग न केल्यानंतर भिंतीवर रोपटी येता कामा नये, कारण फरशी बंद केल्या असतात, परंतु रोपटी आली म्हणजे पाणी आत मुरले आहे, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे काम योग्यरीत्या न झाल्याचे हे द्योतक आहे.

राज्यात यंदा विक्रमी पाऊस पडत असून पाणी आत शिरल्याने भिंत फुगण्याची शक्यता नकारता येत नाही, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. समस्येवर तातडीने उपाय काढण्याची गरज लोकांमधून व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी!

सांताक्रुझ येथील उड्डाणपुलाच्या भिंतीला लावलेल्या फरश्या बाहेर येऊ लागल्या असून त्यातून मातीची गळती होताना दिसते. उड्डाणपुलाचे काम होत असताना सरकारी अधिकाऱ्यांनी योग्यरित्या पर्यवेक्षण न केल्याने ही वेळ आली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

उड्डाणपुलातील फरशी बाहेर येऊ लागल्याने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट दिसते. मातीची गळती होत असल्याने फरशी बाहेर काढतून पुन्हा माती पूर्ववत करून योग्यरीत्या फरशी इंटरलॉक करायला लागणार, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अन्यथा हा उड्डाणपूल कधीही कोसळेल, कारण येथे मोठ्या प्रमाण अवजड वाहने वाहतूक करतात. त्यामुळे त्वरित दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

कर्नल मिलिंद प्रभू, तज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com