Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायतीच्या सरपंचांविरोधात अविश्‍वास ठराव दाखल झाल्यामुळे सत्ताधारी गट सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
Santa Cruz Panchayat
Santa Cruz PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायतीच्या सरपंचांविरोधात अविश्‍वास ठराव दाखल झाल्यामुळे सत्ताधारी गट सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. येथील सत्तेच्या सारीपाटावर विरोधात असलेल्या सहा सदस्यांपैकी काहींना सत्ताधारी गटाबरोबर येण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या इनासियो डॉम्निक परेरा यांनी सत्ताधारी गटाचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र गटविकास अधिकारी आणि पंचायत सचिवांना सादर केले. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या सरपंचांविरोधात तत्काळ परेरा यांच्यासह इतर पाच पंचसदस्यांनी एकत्रित येऊन सहाजणांच्या सहीसह अविश्‍वास ठराव दाखल केला. अविश्‍वास ठराव दाखल झाल्यामुळे सरपंच जेनिफर ओलिवेरा यांचे सरपंचपद अल्पमतात आले आहे.

गुरुवार, १६ रोजी उपसरपंचांच्या निवडीसाठी पंचायत मंडळाची बैठक होणार आहे. त्यात सत्ताधारी गट बाजी मारणार की विरोधातील सहाजणांचा गट आपला उपसरपंच निवडणार हे दिसून येईल. तर दुसऱ्याच दिवशी १७ तारखेला सरपंचांवर दाखल झालेल्या अविश्‍वास ठरावावर बैठक होणार आहे.

त्यावेळी अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यास विरोधी गट सरपंच म्हणून संदीप सावंत यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. यामुळेच अल्पमतात आलेल्या गटाने आता विरोधी गटातील एखादा मोहरा आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यातून आता म्हणे कोणाला कोटींची तर कोणाला लाखांची ऑफर दिली असल्याची चर्चा सांताक्रुझमध्ये सुरू आहे.

Santa Cruz Panchayat
Santa Cruz Goa: अखेर सांताक्रुझ पंचायत घरांच्या पायाभरणीसाठी लागला मुहूर्त!

सरपंच ओलिवेरा यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणणाऱ्यांमध्ये लाफिरा ओलिवेरा, इनासियो परेरा, पीटर आरावजो, संदीप सावंत, ल्युसिया फर्नांडिस आणि रोजी फर्नांडिस अशा सहाजणांचा समावेश आहे. तर अल्पमतात आलेल्या सत्ताधारी गटात सरपंच जेनिफर ओलिवेरा, एल्सन ब्रागांझा, ॲम्बेली गोम्स, मंगेश गावस आणि पेर्पेट्यू फर्नांडिस असे पाच पंचसदस्य आहेत.

Santa Cruz Panchayat
Santa Monica Project Scam : सांता मोनिका धक्का इमारत टर्मिनल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा

सत्ताधारी गटाविरोधात तक्रारी

पंचायतीत सत्ता कोणाची येणार याकडे सांताक्रुझमधील जनतेचे लक्ष लागून आहे. इनासियो परेरा यांच्या पाठिंब्यावर जेनिफर यांनी सरपंचपद भूषविले. परंतु त्यांच्या काळात घरे किंवा बंगले उभारण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे लोक सांगतात.

याशिवाय सत्ताधारी गटाकडून दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या. त्यामुळे संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधातील पाच पंचसदस्यांबरोबर इनासियो यांच्या साथीने सत्ता बदल होईल, असे पीटर आरावजो यांना वाटते.

दरम्यान, सत्ताधारी गटाच्या सरपंचांच्या कामाबाबत आपला आक्षेप असल्यामुळे आपण सत्तेतून बाहेर पडल्याचे इनासियो परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com