आगरवाडा चोपडे पंचायतीतर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार

स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत स्वयंपूर्ण मित्र पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सन्मानित केल्याबद्दल आगरवडा चोपडे पंचायती तर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.
आगरवाडा चोपडे पंचायतीतर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार

आगरवाडा चोपडे पंचायतीतर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मोरजी: आगरवाडा चोपडे पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र दीपक पेडणेकर याना आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत स्वयंपूर्ण मित्र पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सन्मानित केल्याबद्दल आगरवडा चोपडे (Agarwada Chopde Panchayat) पंचायती तर्फे एका विशेष कार्यक्रमात सरपंच भगीरथ गावकर यांच्या हस्ते फुलाचे रोपटे आणि सन्मानपत्र देवून अभिनंदन करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>आगरवाडा चोपडे पंचायतीतर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार</p></div>
...त्या सर्व बेकायदेशीर गोष्टीसाठी मिलींद नाईक जबाबदार: परशुराम सोनुर्लेकर

यावेळी उपसरपंच समिता राऊत,पंच संगीता नाईक, प्रमोदिनी आगरवाडेकर, नीलम मसुरकर, प्रमोद गावकर, माजी सरपंच अमोल राऊत, पशू संवर्धन खात्याच्या सहाय्यक अधिकारी डॉ. अनुराधा नाईक तसेच अन्य उपस्थित होते. म्हापसा विभागीय वनाधिकारी असलेल्या दीपक गणपत पेडणेकर यांची आगारवाडा चोपडे पंचायतीत स्वयंपूर्ण मित्र म्हणून नेमणूक झाल्यानंतर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी त्यांनी विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. प्रामुख्याने कृषी खाते,पशू संवर्धन खाते, समाज कल्याण खाते, ग्रामीण विकास यंत्रणा, मत्सद्योग,आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, हस्तकला महामंडळ, वनखाते आरोग्य खाते, पाणी पुरवठा खाते, आर्थिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, महिला आणि बालकल्याण विभाग आदी सरकारी खात्यांच्या योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून दिला.

प्रामुख्याने त्यांनी आगरवाडा चोपडे पंचायत क्षेत्रातील पडीक जमीन लागवडी खाली आणून भातपीक उत्पन वाढीस लावण्यास शेतकऱ्यांना सहकार्य केले. पंचायत क्षेत्रात भाजीपाला, मिरची उत्पादनास प्रोत्साहन दिले.

<div class="paragraphs"><p>आगरवाडा चोपडे पंचायतीतर्फे दीपक पेडणेकर यांचा सत्कार</p></div>
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी पर्यावरण तज्ज्ञ महेश पाटील

आगरवाडा गावातील प्रमुख व्यवसाय असलेल्या मिठागरातील मीठ उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी मीठ उत्पदकाना मार्गदर्शन केले. तसेच शेती व्यवसायाबरोबरच दूध व्यवसाय करणाऱ्या दूध व्यवसायिकांना त्यांनी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच बरोबर कुकुट पालन व्यवसायास प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत गोवा सरकारने (Goa Government) त्यांना स्वयंपूर्ण मित्र पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले आहे.

याविषयी दीपक पेडणेकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले,आपण आपल्या सरकारी सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. आगरवाडा चोपडे पंचायतीत स्वयंपूर्ण मित्र म्हणून नेमणूक झाल्यानंतर सरपंच, पंच, पंचायत सचिव आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने शासकीय योजनांचा पाठपुरावा केला या कामी पंचायत सबंधित सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे शक्य झाले आगरवाडा चोपडे गावातील नागरिक कष्टकरी आहेत. त्यांनी शेती बागायती, मीठ व्यवसाय, मासेमारी आदी पारंपरिक व्यवसाय सांभाळून ठेवले आहेत. गावात पारंपरिक वैद्य असून त्यांनीही जनसेवा चालू ठेवली आहे अश्या पारंपरिक वैद्यांना जैविक विविधता मंडळा तर्फे वैद्य मित्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. ऐकून या सर्व कामात पंचायतीचे मोठे सहकार्य मिळाल्याचे सांगून त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याची संधी मला मिळाली. याचे श्रेय मी आगरवाडा चोपडे पंचायतीचे आजी माजी सरपंच पंच, स्थानिक आमदार तसेच नागरिकांना देतो असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com