Amthane Dam: आमठाणे धरणातील जलसाठ्यात जवळपास 3.5 मीटर घट; साठा नियंत्रणावर देणार भर

गुरुवारपर्यंत धरणातील पाण्याची पातळी जवळपास साडेतीन मीटर एवढी कमी झाली आहे.
Water storage in Amthane Dam in Goa is low
Water storage in Amthane Dam in Goa is lowDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: यंदा समाधानकारक पाऊस पडूनही डिचोलीतील ‘आमठाणे’ धरणातील जलसाठ्याची पातळी सध्या किंचित घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारपर्यंत धरणातील पाण्याची पातळी जवळपास साडेतीन मीटर एवढी कमी झाली आहे.

जानेवारीत धरणाच्या सभोवतालचे पात्र कोरडे पडू लागले असले, तरी काळजी करण्याचे कारण नाही. आवश्यकतेनुसार धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती जल संसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र 582 हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी 50 मीटर एवढी आहे. गुरुवारी या धरणातील जलसाठ्याची पातळी 46.5 मीटर एवढी झाली आहे. यंदा मान्सूनला सुरवात होपर्यंत धरणातील जलसाठा समाधानकारक होता. पावसाळ्यातही हे धरण दोनवेळा तुडुंब भरले होते.

Water storage in Amthane Dam in Goa is low
Ponda: वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; 2022 मध्ये तब्बल दोन कोटींचा महसूल जमा

गेल्या दोन वर्षांपासून या धरणात मगरीचा संचार आहे. त्यामुळे आंघोळ किंवा मजा लुटण्यासाठी धरणात उतरणे धोक्याचे बनले आहे. तशी धोक्याची सूचनाही जलस्रोत खात्यातर्फे धरण परिसरात लावले आहेत. गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यासाठी या धरणात उतरलेल्या राजस्थान येथील पर्यटकावर मगरीने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या पर्यटकाचा बळी गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com