Goa Crime: धक्कादायक! मांडवी पुलाची दुरुस्ती सुरु असताना कामगारांना आढळला कुजलेला मृतदेह, गूढ घटनेने खळबळ

Old Mandovi Bridge: नवीन मांडवी पुलाखाली सोमवारी (७ मार्च) कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीतील नवीन मांडवी पुलाखाली सोमवारी (७ एप्रिल) एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहाची स्थिती पाहता संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी अग्निशामक दलाला याबाबत मााहिती कळविण्यात आली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असता, पुलाखालील खांबांच्या मध्ये सडलेल्या अवस्थेतील हा मृतदेह आढळून आला.

मृतदेह अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा असल्याचे सांगण्यात आलं आहे. मृतदेहाजवळ काही कपडे व इतर वैयक्तिक वस्तू आढळल्या आहेत, हा व्यक्ती नवीन मांडवी पुल परिसरातीलचं असेल, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Goa Crime News
Goa BJP: भाजपात आलेल्यांना शिस्त अंगवळणी पडतेय! नाईक यांचे स्पष्टीकरण; आजगावकरांविषयी कसलाही ठराव नसल्याचा दावा

मृतदेहाचा चेहरा सडलेला असला तरी शरीरावर कोणत्याही प्रकारचे जखम असल्याचं आढळून आलेले नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, काम करणाऱ्या कामगारांना हा मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, मृत इसमाची ओळख पटवण्याचे तसेच मृत्यूमागील कारण शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

Goa Crime News
Goa Congress: ‘त्या’ 8 गद्दारांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही, माणिकराव ठाकरे कडाडले; अन्य पक्षाशी युतीबाबत भाष्य करणे टाळले

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेहमीच वर्दळीचा असणारा हा परिसर अचानक अशा प्रकारच्या घटनेमुळं चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com