G-20 Summit Goa 2023: जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड कर्ज असुरक्षिततेवर उपाय हवा

100 प्रतिनिधींचा सहभाग: ‘जी-20’च्या स्थापत्य गटाच्या बैठकीचा सूर
G-20 Summit
G-20 SummitDainik Gomantak
Published on
Updated on

G-20 Summit Goa 2023: 21 व्या शतकातील सामायिक जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुस्तरीय विकास बँक बळकटीकरण गरजेचे असून जागतिक कर्ज असुरक्षिततेवर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे, असा सूर जी-20 आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत उमटला.

तिसऱ्या  ‘जी-20’ आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाच्या बैठकीचा आज गोव्यात समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत जी 20 सदस्य देश,निमंत्रित देश आणि बहुस्तरीय विकास बँकांसह (एमडीबी), विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुमारे 100 प्रतिनिधींचा सहभाग होता.

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कार्यगटाचे सहअध्यक्षपद भूषवणाऱ्या फ्रान्स आणि कोरिया या देशांसह वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक  यांनी संयुक्तपणे या बैठकीचे संचालन केले.

G-20 Summit
कुंकळ्ळीची क्रांतिगाथा अभ्यासक्रमात

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुस्तरीय विकास बँक बळकट  करणे, जागतिक कर्ज असुरक्षिततेवर उपाय शोधणे, जागतिक आर्थिक संरक्षक जाळ्याचे  बळकटीकरण करणे, आंतरराष्ट्रीय  नाणेनिधीच्या सामान्य एसडीआर वाटपाचा पाठपुरावा करणे,  शाश्वत भांडवली ओघाच्या माध्यमातून  आर्थिक लवचिकता बळकट  करणे  आणि प्रमुख बँकांच्या डिजिटल चलनांच्या समग्र  आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करणे या विषयावर दीर्घ चर्चा झाली.

G-20 Summit
Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

प्रतिनिधींनी केली गोवा सफर

जी 20 प्रतिनिधींनी गोव्याच्या संस्कृतीचा पाककलेच्या आदरातिथ्यासह भारताची सांस्कृतिक समृद्धता आणि विविधता देखील अनुभवली. प्रतिनिधींसाठी जुन्या गोव्यातील युनेस्को  वारसा स्मारकांना भेट देण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यांनी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि म्युझियम ऑफ ख्रिश्चन आर्टला भेट दिली.या प्रतिनिधींना पणजीच्या  लॅटिन क्वार्टर्सच्या फॉन्टेनहास आणि साओ टोम वॉर्डांची  सफर घडवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com