Goa News: सारमानस ते पिळगावपर्यंतचा शॉर्टकट रस्ता, एका शिपबिल्डिंग आस्थापनाचे बांधकाम आदी मुद्यांवरून पिळगाव पंचायतीची ग्रामसभा गाजली. पंचायत स्थानिक समितीला विश्वासात घेत नसल्याच्या मुद्यावरून ग्रामस्थही आक्रमक झाले.
ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडिमार करून पंचायत मंडळाला धारेवर धरले. खासकरून उपसरपंचांवर ग्रामस्थांचा रोख होता. सकाळी १०.३० वा. सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी उशिरापर्यंत चालली. पिळगाव पंचायतीची ग्रामसभा रविवारी (ता.२८) सरपंच मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ग्रामसभेस उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह उमाकांत परब गावकर, सोनिया बेतकीकर आणि चेतन खोडगीणकर हे पंचसदस्य उपस्थित होते. तर शर्मिला वालावलकर आणि स्वप्नील फडते हे पंचसदस्य अनुपस्थित होते. सरपंच जल्मी यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव प्रवीण परब यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.
पंचायतीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह : एका शिपबिल्डिंग आस्थापनाकडून करण्यात आलेल्या बांधकामाचा विषय माजी सरपंच दिलीप गावस यांनी उपस्थित केला. सारमानस-पिळगाव शॉर्टकट रस्त्यावरील जंक्शनवर वाहतुकीस धोका निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. स्थानिक समितीला पंचायत विश्वासात घेत नाही. घेतलेल्या निर्णयात ऐनवेळी बदल होतात, अशी तक्रार देविदास प्रभुगावकर यांनी केली.
सुरक्षा व्यवस्था ढेपाळलेली
या ग्रामसभेत सारमानस फेरीधक्क्याचा प्रश्न अनिल नाईक यांनी उपस्थित केला. हा फेरीधक्का असुरक्षित आणि धोकादायक बनला असून या फेरीधक्क्याजवळ सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी पुढे आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.