Sarvan Junction Accident: दुर्दैवी! सवर्ण जंक्शन घटनेतील युवकाचा मृत्यू; रंब्लर्समुळे झाला होता अपघात

Bicholim Sanquelim Road Accident: पंधरा दिवसांपूर्वी सर्वण जंक्शनजवळील रंब्लर्सवरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्वण येथील रावजी (उल्हास) सावंत या युवकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बांबोळी येथील गोमेकॉ इस्‍पितळात उपचार सुरू असताना आज गुरुवारी पहाटे त्‍याने अखेरचा श्‍‍वास घेतला.
Bicholim Sanquelim Road Accident Death
Bicholim Sanquelim Road Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Sarvan Junction Bicholim Sanquelim Road Accidental Death Due To Rumblers

डिचोली: नेहमीच वादाचा विषय ठरलेल्या डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनजवळील रंब्लर्सने अखेर पहिला बळी घेतलाच पंधरा दिवसांपूर्वी या रंब्लर्सवरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्वण येथील रावजी (उल्हास) सावंत या युवकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बांबोळी येथील गोमेकॉ इस्‍पितळात उपचार सुरू असताना आज गुरुवारी पहाटे त्‍याने अखेरचा श्‍‍वास घेतला.

गेल्या २३ सप्टेंबर रोजी रात्री सर्वण जंक्शनजवळील रंब्लर्सवर दोन दुचाकी वाहनांमध्ये माेठा अपघात झाला होता. त्यात स्कूटरचालक रावजी हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू होते. परंतु आज त्‍याची प्राणज्‍योत मालवली.

दरम्यान, रावजी याच्या पार्थिवावर आज सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Bicholim Sanquelim Road Accident Death
Baga Beach Boat Accident : लाटेच्या तडाख्यात गोव्यात उलटली बोट! बागा येथील घटना; बेकायदेशीर जलसफारीमुळे तात्काळ कारवाई

आकार लहान करा किंवा गतिरोधक बसवा

लोकांच्या विरोधामुळे डिचोली शहरातील व्हाळशी येथील मुख्य रस्त्यावरील रंब्लर्स काढून गतिरोधक बसवले आहे. त्याच धर्तीवर सर्वणमधील रंब्लर्स काढून त्या ठिकाणी गतिरोधक बसवावे किंवा या रंब्लर्सचा आकार लहान करावा, अशी मागणी होत आहे. एका युवकाचा बळी गेल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येऊन, धोकादायक रंब्लर्सच्या बाबतीत उपाययोजना करण्यात येईल काय, याकडे वाहनचालक आणि लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आता तरी रंब्लर्स काढणार?

डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण जंक्शनजवळ चार महिन्यांपूर्वी रंब्लर्स बसविण्यात आले आहेत. मात्र सुरवातीपासूनच त्‍यास विरोध होत आहे.

सर्वण जंक्शन ते गोकुळवाडापर्यंत साधारण पाव किलोमीटर अंतराच्या आत सहा ठिकाणी रंब्लर्स घालण्यात आले आहेत. शिवाय मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या सर्वणच्या अंतर्गत रस्त्यावरही रंब्लर्स घालण्यात आहेत.

रंब्लर्स घालताना व्यवस्थित नियोजन करण्यात आलेले नाही. त्‍यांचा आकारही मोठा आहे. परिणामी वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. जोरदार गचके बसून, वाहनांच्या सुट्या भागांची मोडतोड होत आहे. अपघात वाढले आहेत.

अवजड वाहने या रंब्लर्सवरून वेगाने गेली तर मोठा आवाज होतो. रात्रीच्या वेळी तर हे रंब्लर्स परिसरातील लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे त्‍यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com