केपेत अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पंचनामा करून मृतदेह दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Death body found hanging in Quepem, Goa
Death body found hanging in Quepem, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केपे येथील जंगल परिसरात पोलिसांना अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी आढळून आला. केपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. (Death body found hanging in Quepem, Goa)

Death body found hanging in Quepem, Goa
सदानंद शेट तानावडेंच्या आरोपांचे काँग्रेसकडून खंडन

पंचनामा करून मृतदेह दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीएसआय वेरोनिका कौटिन्हो आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व कायदेशीर औपचारिकता पार पाडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केपे येथील झेवियर परेरा नावाच्या व्यक्तीला जंगलात एका काजूच्या झाडाला (Tree) लटकलेला मृतदेह दिसला. याबाबत त्याने पोलिसांना (Police) माहिती दिली. मृत व्यक्तीच्या अंगात पातळ पिवळा टी-शर्ट आणि जीन पेंट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या जवळ कोणतेही पत्र सापडलेले नाही. पीआय दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली पीएसआय कौटिन्हो तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com