Dead Body Found at Divja Circle
Dead Body Found at Divja Circle Dainik Gomantak

Panjim : पणजीतील दिवजा सर्कलवर नदीपात्रात मिळाला अज्ञाताचा मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल; मृत व्यक्ती वयस्क असल्याची प्राथमिक माहिती
Published on

Panjim : पणजीतील दिवजा सर्कल परिसरात आज सकाळी एका अज्ञाताचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मांडवी नदीपात्रात हा मृतदेह तरंगताना आढळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटवण्याचं कामही सुरु केलं आहे. (Panaji Latest News)

पणजीत दिवजा सर्कलजवळच असलेल्या मांडवी नदीच्या पात्रात आज सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह एका वयस्क व्यक्तीचा असल्याची माहिती आहे. दरम्यान या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.

Dead Body Found at Divja Circle
Goa Accident : कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रक पुलावरुन खाली कोसळला

पणजी पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे. मृत व्यक्तीच्या खिशातून पोलिसांना रोख रक्कम आणि एक सिमकार्ड मिळालं आहे. पोलिसांनी या दोन्हीही गोष्टी ताब्यात घेतल्या असून मृताची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. पंचनामा झाल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीतील गोमेकॉ रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com