Dead Body Found in Bandora: काल (मंगळवार) फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांना बांदोड्यातील एका नदीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली, मात्र तो मृतदेह नसून मोठा प्लॅस्टिकचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यातच अजून एक माहिती समोर आली आहे. शिरोडा येथील एका व्यक्तीने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य रविवारपासून बेपत्ता असून त्याने नदीत उडी मारली असावी, असा संशय त्यांना आहे.
मात्र नदीत सापडलेला तो मृतदेह नसून प्लॅस्टिक आहे समजल्यावर कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याची मागणी अधिकाऱ्यांना केली. यानंतर बेपत्ता सदस्याचा तपास करण्यासाठी अग्निशमन दलाने शोध मोहीम राबवली. मात्र त्यांच्या हाती काही आले नाही.
त्यामुळे जर खरंच त्या सदस्याने पाण्यात उडी मारली असेल तर त्याचा मृतदेह वाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्यता अधिकाऱ्यानी व्यक्त केली. याबाबत सध्या हाती काहीच नसल्याने जी माहिती मिळेल त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.