Margao: 6 दशकांपूर्वी बांधलेली, ऐतिहासिक मडगाव कोमुनिदाद इमारत धोकादायक यादीत; स्वातंत्र्यसैनिकांनी केली नूतनीकरणाची मागणी

Margao Comunidade Building: सदर इमारतीच्या मागे सुशोभीकरण केलेले लोहिया मैदान आहे. मात्र या इमारतीच्या दुरवस्थेमुळे लोहिया मैदानाची सुंदरता लोप पावत आहे.
Margao Comunidade Building
Margao Comunidade BuildingDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव मधील कोमुनिदाद इमारत जवळ जवळ सहा दशकांपूर्वी बांधण्यात आली होती. ही इमारत ऐतिहासिक महत्व असलेली भूषणावह अशी इमारत आहे, मात्र योग्य प्रकारे देखरेख न केल्याने ही इमारत जीर्ण झाली असून ती शहरातील एक धोकादायक इमारत म्हणून सध्या तिची नोंद आहे.

सदर इमारतीच्या मागे सुशोभीकरण केलेले लोहिया मैदान आहे. मात्र या इमारतीच्या दुरवस्थेमुळे लोहिया मैदानाची सुंदरता लोप पावत आहे. याच इमारतीत स्वातंत्र्य सैनिक संघटनेची कचेरी आहे. कोमुनिदाद इमारतीचे तात्काळ नूतनीकरण करावे अशी मागणी स्वातंत्र्यसैनिकांतर्फे १८ जून क्रांती दिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी आज केली.

पाऊस पडतो तेव्हा आमच्या कचेरीत सर्वत्र पाणी साचते. तरीही आम्ही स्वतः खर्च करून कचेरीच्या भिंतीना रंगरंगोटी केली आहे. नवीन वीज उपकरणे बसवली आहेत, असे त्यांनी सांगितले. लोहिया मैदानाचे व या इमारतीचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही जागृत आहोत, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

Margao Comunidade Building
Margao Bandra Express: ‘मडगाव-बांद्रा एक्सप्रेस’ मंदावली! प्रवासी संख्येत घट; थांब्यांवरती विचार करण्याची गरज

आमदार नीलेश काब्राल सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी कोमुनिदाद इमारतीचे नूतनीकरण खात्यातर्फे करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी २.६५ कोटींच्या खर्चाची निविदाही जारी केली होती.

Margao Comunidade Building
Tivim Comunidade Election: मतदान प्रक्रियेवर गावकारांचा बहिष्कार! थिवी कोमुनिदाद निवडणूक ठरली वादळी; मतदानासाठी बोगस ओळखपत्रांचा वापर

पण कोमुनिदाद समितीने त्यास आक्षेप घेतल्याने व स्वतः नूतनीकरण करण्याची तयारी दर्शविल्याने नूतनीकरणाची प्रक्रिया पुढेच गेली नाही, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com