Ponda News: बेतोडा नाल्‍यात घातक रसायनाचा मारा; जैवसंपदा आलीय धोक्‍यात

तीव्र संताप : मासे गतप्राण; नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

बेतोडा-फोंडा येथील नाल्यात हानिकारक रसायन सोडण्याचा प्रकार सातत्याने होत आहे. आज मंगळवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात हे केमिकल नाल्यात सोडल्याने खळबळ उडाली. या प्रकाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, नाल्यात मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाल्याने घबराट पसरली केली. या प्रकरणी गेल्या वर्षी तक्रारही दाखल करण्यात आली होती, पण त्याची दखल घेतली नसल्याने आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा फोंडावासीयांनी दिला आहे.

बोणबाग, बेतोडा ते कुर्टी-फोंडा, खडपाबांध तसेच कवळे व गावणेपर्यंत हा नाला जातो. या नाल्यात बेतोडा औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाकडून हानिकारक रसायन सोडले जाते. लोकांची नजर चुकवून संध्याकाळच्या वेळेस हा प्रकार केला जातो, त्यामुळे सहसा कुणाचे लक्ष जात नाही. आज मंगळवारी संध्याकाळी हे रसायन सोडल्याचे स्पष्ट झाल्याने फोंड्यातील नागरिकांनी बेतोडा नाल्याला भेट देऊन निषेध केला.

या घातक रसायनामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून अनेकदा नाल्यातील छोटे मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन संबंधित प्रकल्पावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Ponda News
Karnataka-Goa Highway: कर्नाटक-गोवा महामार्गावर टोल वसुलीला सुरवात

परिसरात भीतीचे वातावरण लहान मासे मरण्याचे प्रकार वाढले

बेतोडा ते फोंडा व पुढे कवळे व गावणे भागात जाणाऱ्या या नाल्यात घातक रसायन सोडण्याच्या प्रकारामुळे अनेकदा त्‍यातील लहान मासे मृत झाल्‍याचे आढळून आले आहे. हे मासे मोठ्या प्रमाणात पाण्यात तरंगताना आढळल्याने एकूणच जैवसंपदेवर घाला घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाल्यात जलचरांबरोबरच जैववनस्पतीही मोठ्या प्रमाणात आहेत. घातक रसायनाचा प्रादुर्भाव या वनस्पतींवरही होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

Ponda News
Goa Youth Congress Protest: गळ्यात बटाटे, टोमॅटोच्‍या माळा घालून निषेध; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा

आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय काय?

नाल्यात घातक रसायन सोडण्याच्या प्रकारामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. विशेष म्हणजे नागझरी-कुर्टी येथे तर लहान मुले या पाण्यात डुंबत असतात. या भागातील मजूर लोकांच्या बायका कपडे धुण्यासाठी नागझरी येथे या नाल्यावर येत असल्याने या प्रदूषित पाण्यापासून त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होत आहे.

गेल्या वर्षी छटपूजेच्या दिवशी अचानक हे घातक रसायन सोडण्यात आले होते. त्यावेळी पूजा आयोजन समितीने फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांच्या नजरेला ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच संबंधित खात्यांनी या प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याची सूचना केली होती. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरोग्य खात्याने अजून काहीच पाठपुरावा केलेला नाही.

Ponda News
Goa Rajyasabha Election: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सदानंद शेट तानावडे यांनी दाखल केला राज्यसभेसाठी अर्ज

संध्याकाळच्या वेळी साधली जातेय संधी

बेतोडा येथील नाल्यात संध्याकाळच्या वेळेला घातक रसायन सोडले जाते. फेसाळयुक्त हे घातक पाणी नाल्यात मिसळत असल्याने जैवसंपदा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षी यासंबंधी तक्रार केली होती, पण कोणतीच कारवाई झाली नाही.

संदीप पारकर (आरटीआय कार्यकर्ते)

लक्ष कुणी द्यायचे?

दिवसाढवळ्या हा प्रकार होत असूनही सरकारी यंत्रणा डोळे बंद ठेवून काम करत आहे. सदर घातक रसायन येते कुठून, कोणता प्रकल्प ते नाल्यात सोडतो, याची चौकशी सरकारी यंत्रणेने करायला हवी. अन्‍यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

नीलेश नाईक, फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com