Margao: मडगाव शहरात 30 धोकादायक इमारती! भाडेकरू जागा सोडायला तयार नाहीत; दुरुस्तीकडेही दुर्लक्ष

Margao dangerous buildings: धोकादायक परिस्थितीत असूनही भाडेकरू आपली जागा भाडेकरू हक्क जाईल, या भीतीने सोडायला तयार नाहीत, असे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
Margao dangerous buildings
Margao dangerous buildingsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावात एक दोन नव्हे, तर जवळ जवळ ३० धोकादायक इमारती आहेत. यातील अधिक इमारती सरकारच्या मालकीच्या नाहीत. त्यांचे मालक खाजगी असल्याने या इमारतींची देखरेख व वेळोवेळी दुरुस्ती करणे, ही त्या मालकांची जबाबदारी आहे.

त्या इमारतींत जे भाडेकरू राहतात, तेसुद्धा दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नाहीत. इमारत धोकादायक परिस्थितीत असूनही भाडेकरू आपली जागा भाडेकरू हक्क जाईल, या भीतीने सोडायला तयार नाहीत, असे आमदार दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसात दोन इमारतीच्या बाल्कनी, सज्जे कोसळले आहेत. या संदर्भात बोलताना आमदार दिगंबर कामत म्हणाले, जुन्या व धोकादायक इमारतींची प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सोमवारी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन संपूर्ण गोव्यासाठी सरकारी धोरणाबद्दल त्यांच्याकडे चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारी इमारतीची सुद्धा परिस्थिती तशीच आहे. मडगाव नगरपालिका इमारती, कोमुनिदाद इमारत, जुने हॉस्पिसियो, मडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, जुनी मामलेदार, जिल्हाधिकारी इमारत इत्यादी. धोकादायक असलेल्या खाजगी व सरकारी इमारती पाडण्याचा आदेश न्यायालयाने तसेच जिल्हाधिकारी कचेरीतूनही आला आहे.

इमारती पाडण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नगरपालिका इमारतीची हल्लीच रंगरंगोटी करण्यात आली आहे व इमारतीचे नूतनीकरण जीएसआयडीसीमार्फत केले जाईल, असे सांगण्यात येते.

कोमुनिदाद इमारतीची दुरावस्था सर्वांनाच माहीत आहे. या इमारतीलगत असलेल्या लोहिया मैदानाचे नूतनीकरण व सौदर्यीकरण झाले आहे. मात्र या इमारतीच्या नूतनीकरणावरून कोमुनिदाद समिती व सार्वजनिक बांधकाम खाते यांचे मतभेद असल्याचे कळते. सरकारी पातळीवर या इमारतीच्या नूतनीकरणाचा घाट आहे.

जुन्या हॉस्पिसिओ इमारतीचे वारसा इमारत म्हणून जतन केले जाईल व पुनर्वसन केंद्र म्हणून तिचा वापर केला जाईल तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे हल्लीच आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. मडगाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची भिंत गेल्या वर्षी पावसाळ्यात कोसळली होती.

Margao dangerous buildings
Margao Old Building: ..अनर्थ टळला! जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून 3 गाड्यांचे नुकसान; मडगावातील जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

तिचे दुरुस्तीचे काम सुरू आहे, पण पूर्ण झालेले नाही. जुन्या मार्केटमध्ये जी ओळीने दुकाने आहेत, ते बांधकामसुद्धा पुष्कळ जुने आहे. ते सुद्धा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. दुरुस्ती व नूतनीकरणाची आश्वासने वेळोवेळी दिली जातात. मात्र प्रत्यक्षात काहीही केले जात नाही, असा अनुभव मडगावकरांना आला आहे.

इतिहासकार व समाजसेवक योगेश नागवेकर यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या इमारतीबद्दलचा मुद्दा यापूर्वी उपस्थित केला आहे. जुन्या इमारतीत जी २०१८ साली असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आली, त्याच इमारतीत दुकान थाटून त्याचे उद्‍घाटन सुद्धा केले जाते. हा काय प्रकार हेच समजत नाही. अशा इमारतीतील व्यापाऱ्यांना सुद्धा ती एक ना एक दिवस पडणार हे माहीत आहे. नगरपालिका सुद्धा यावर गंभीरपणे विचार करीत नाही.

Margao dangerous buildings
Margao: कोंब-मडगाव येथे रेल्वेफाटकापाशी होतेय गर्दी! अतिक्रमणे वाढली; उड्डाणपुलाची होतेय मागणी

राजकारण्यांचा आशिर्वाद...

मडगावात अनेक इमारती असुरक्षित व धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती, ती होत नाही. ज्या धोकादायक नसूनही नगरपालिकेने तेथील राहणाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पाडण्याचे आदेश दिले आहेत. जी इमारती असुरक्षित जाहीर झाली आहे, त्याच इमारतीमध्ये राजकारण्यांच्या आशिर्वादाने तिथे दुकान थाटले जाते, हे कशाचे धोतक आहे, असा प्रश्न सावियो कुतिन्हो यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com