Fatorda: दामूंनी फातोर्ड्याचा विकास केला, तर ते 3 वेळा पराभूत का झाले? गोवा फॉरवर्ड नगरसेवकांचा पलटवार

Damu Naik: इस्पितळ व रवींद्र भवनमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. इस्पितळामध्ये रुग्णांची योग्य व्यवस्था होत नाही, तर रवींद्र भवनात तियात्रिस्टांना न्याय मिळत नाही, असे या नगरसेवकांनी सांगितले.
Goa Forward Fatorda About Damu Naik
Goa Forward Fatorda About Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दामू नाईक यांनी फातोर्डा मतदारसंघाचा विकास केला, असे भाजपच्या मेळाव्यात म्हटले होते. पण त्यांनी फातोर्ड्याचा विकास केला,तर ते तीन वेळा का पराभूत झाले?

असा सवाल गोवा फॉरवर्डचे नगरसेवक राजू नाईक, निमिशा फालेरो, वितोरीन त्रावासो, जॉन क्रास्तो, गोवा फॉरवर्डचे फातोर्डा ब्लॉक अध्यक्ष पिटर फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केला.

दामू नाईक सांगतात त्याप्रमाणे त्यांनी सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, रवींद्र भवन यांच्याकडे बोट दाखवले.

मात्र हे दोन्ही प्रकल्प दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. इस्पितळ व रवींद्र भवनमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. इस्पितळामध्ये रुग्णांची योग्य व्यवस्था होत नाही, तर रवींद्र भवनात तियात्रिस्टांना न्याय मिळत नाही, असे या नगरसेवकांनी सांगितले.

Goa Forward Fatorda About Damu Naik
Damu Naik: 'मडकई काबीज करण्यासाठी ताकद एकवटावी'! दामूंचे कार्यकर्त्यांना आवाहन; मगोच्‍या बालेकिल्ल्‍यात भाजपचे शक्तीप्रदर्शन

ज्या शेत जमीनीवर इस्पितळ व रवींद्र भवन बांधण्यात आले तेथील शेतकऱ्यांना सरकारने सापत्न वागणूक दिली. त्यांना योग्य मोबदला सुद्धा देण्यात आला नाही. फातोर्डा पोलिस स्टेशन सरदेसाई यांच्या कार्यकाळातच झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

Goa Forward Fatorda About Damu Naik
Fatorda: फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ बिल्‍डरची तुरुंगात रवानगी! भरपाई नाही, सुनावणीस गैरहजर; ग्राहक आयोगाने दिला लक्षवेधी आदेश

विजय सरदेसाई विरोधी बांकावर आहेत. दामू नाईक तर गेली १३ वर्षे सरकारी पक्षात आहेत, तरी कदंब बस स्थानकाची अशी दुर्दशा का झाली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com