Damodar Vari: श्री दामबाबाची पायी वारी; युवकांचा वाढता प्रतिसाद

Damodar Devsthan: ११ वर्षांची परंपरा; श्रावण महिन्यात भक्तिभावाने होते आयोजन
Damodar Devsthan: ११ वर्षांची परंपरा; श्रावण महिन्यात भक्तिभावाने होते आयोजन
Damodar VariDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गेल्या ११ वर्षांपासून मडगावातील लोक अर्थात मडगावकर जांबावली येथील श्री दामबाबाची वारी करत आले आहेत. ही पायी वारी दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाते. मडगावच्या पिंपळकट्ट्यावरून पदयात्रेला सुरूवात झाली. केपे येथे थोडी विश्रांती घेऊन शिरवईमार्गे जांबावलीला पाच तासांनी पदयात्रा पोहोचली. तेथे श्री दामबाबाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.

याबाबत बोलताना सूरज विर्डीकर यांनी सांगितले की, ११ वर्षांपूर्वी जेव्हा ही वारी सुरू झाली तेव्हा केवळ अकरा युवक होते. आता ५२ ते ५५ युवक या पदयात्रेत सहभागी होतात. कुडचडेहूनसुद्धा काही युवक नंतर त्‍यात सामील होतात. आधुनिक तंत्रज्ञान कितीही वाढीस लागले असले तरी देवाची भक्ती ही श्रेष्ठ असते असे विर्डीकर सांगतात. मडगावकरांची दामबाबावर खूप मोठी श्रद्धा आहे. त्यामुळेच कित्येक नैसर्गिक आपत्तींपासून मडगावकर सुरक्षित आहेत, असेही ते सांगतात.

मडगावातून पायी वारी करून जांबावलीला जाऊन श्री दामबाबाचे दर्शन घेण्यात जो आनंद मिळतो, त्‍यास तोड नाही. त्‍यामुळे मन:शांती मिळते. शिवाय देवाच्या दर्शनात जास्त भक्तिरस सामावलेला असतो, असे सूरज विर्डीकर यांनी सांगितले.

Damodar Devsthan: ११ वर्षांची परंपरा; श्रावण महिन्यात भक्तिभावाने होते आयोजन
Damodar Saptah Vasco: आठव्या दिवशीही फेरी हाऊसफुल्ल! दामबाबा सप्ताहानिमित्त मोठी गर्दी

एक वेगळाच आनंद, अनुभव मिळतो

मडगाव ते जांबावली ही पाच तासांची वाट असून गेल्‍या सात वर्षांपासून मी या वारीत सहभागी होत आहे. वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पदयात्रेमुळे एक वेगळाच आनंद मिळतो. तसेच सर्वजण पायी जातात म्हटल्यावर एक वेगळाच अनुभव मिळतो, असे एक भाविक परेश बोरकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com