Goa Rain: केळी, सुपारीची झाडे, संरक्षक भिंत वाहून गेली
Canacona FarmersDainik Gomantak

Canacona News: काणकोणात शेतकऱ्यांना जोरदार फटका; शेतीची मोठी हानी

Goa Rain: केळी, सुपारीची झाडे, संरक्षक भिंत वाहून गेली
Published on

मुसळधार पावसामुळे तालुक्यात बागायती व भातशेतीची नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसानी गावडोंगरी व खोतीगावात झाली आहे.

गावडोंगरीत तळपण नदीच्या जोड नाल्यांना पूर येऊन किनाऱ्याजवळील बागायतीत पाणी घुसून केळी, सुपारीची झाडे वाहून गेली. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील भूपर, फुलांमळ, भार्स व अन्य भागात शेतकऱ्यांना फटका बसला.

भूपर येथील दीपू फळदेसाई यांच्या बागायतीजवळील नदी किनाऱ्याची सुमारे ३० मीटर संरक्षक भिंत पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेली. तसेच पेरणी केलेली शेती तसेच तरवा वाहून गेला आहे. कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी या भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com