Goa Forests Fire : अनमोड घाटातही आगीमुळे नुकसान

जंगलात जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने आग झाडांच्या फांद्यनी विझवावी लागत आहे
Fire
Fire Dainik Gomantak

अनमोड घाटाच्या पायथ्याशी घनदाट जंगलात चढ, उतार असल्याने जंगलात फिरणे देखील अवघड झाल्याने त्यात आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चालले आहे. जंगलात जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने आग झाडांच्या फांद्यनी विझवावी लागत आहे.

शनिवारी दिवसभर या भागात लागलेली आग विझविण्यासाठी दोनशे पेक्षा अधिक लोकांना आग विझवणे शक्य झाले नाही, असे उपवनपाल आनंद जाधव यांनी आज सकाळी सुर्ला साकोर्डा येथे सांगितले.

रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खातकोण, बाराभूमी मंदिर परिसर व तांबडीसुर्ल येथील अनमोड घाटातील खोऱ्यात भडकलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन रक्षक, वनकर्मचारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, वाळपई वनकर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांचे पथके तैनात करण्यात आले आहेत.

भगवान महावीर अभयारण्यातील जंगलात आगीचा वणवा पेटलेला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काल, आज रविवारी सकाळी हवाई नौदलाच्या हॅलिकॉप्टर्सने आग विझवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

Fire
Goa Forests Fire : अडवलपालमध्ये आगीवर नियंत्रण; सारमानस, मायनिंग डंप परिसरात मोठे नुकसान

"जंगलात लागलेल्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. भडकलेली आग आटोक्यात आणू शकतो, मात्र सुक्या लाकडाला लागलेली आग वाऱ्या प्रवाहामुळे एखादी ठिणगी पडून आग पुन्हा भडकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे, असे म्हणता येणार नाही."

- आनंद जाधव, उपवनपाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com