Goa Forests Fire : अडवलपालमध्ये आगीवर नियंत्रण; सारमानस, मायनिंग डंप परिसरात मोठे नुकसान

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली
Maharashtra| Mumbai fire
Maharashtra| Mumbai fireDainik Gomantaj
Published on
Updated on

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर अडवलपाल येथील मायनिंग डंप परिसरात लागलेली आग नियंत्रणात आली. आज डिचोलीपासून जवळच सारमानस परिसरात पठाराला आग लागली.

त्यामुळे काही प्रमाणात निसर्गाचे नुकसान झाले. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणली.

Maharashtra| Mumbai fire
Goa Board Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा मोठा निर्णय! आता 'हे' विद्यार्थीही देऊ शकतात परीक्षा

‘अग्निशमन’चे मदतकार्य

अडवलपाल परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी काल अडवलपाल येथे धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. मात्र आग नियंत्रणात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

धूमसत असलेल्या आगीने पुन्हा पेट घेतला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पुन्हा घटनास्थळी धाव घ्यावी लागली. अखेर अथक प्रयत्नानंतर सायंकाळी आग नियंत्रणात आणणे अग्निशमन दलाला यश आले.

आजच्या मदतकार्यावेळी दलाचे अधिकारी शैलेश गावडे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर व्ही. डी. गावकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग नियंत्रणात आणली. या आगीत काजूची झाडे जळून खाक झाली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com