Mumbai Goa Flight: मुंबई - गोवा विमानाचा प्रवास केवळ 85 रुपयांत? व्हायरल होतेय एअर इंडियाचे तिकीट

देश प्रगतीच्या दिशेने वेगात वाटचाल करत आहे. पण असाही काळ होता जेव्हा सुविधा प्रमाणात होत्या आणि पैसा थोडा असला तरी त्याचे मूल्य अधिक होते.
Mumbai Goa Flight
Mumbai Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Flight: स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात बरेच बदल झाले आहेत. देश प्रगतीच्या दिशेने वेगात वाटचाल करत आहे. पण असाही काळ होता जेव्हा सुविधा प्रमाणात होत्या आणि पैसा थोडा असला तरी त्याचे मूल्य अधिक होते.

अलिकडे परिस्थिती सुधारत असून, महागाई देखील वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी ज्या वस्तू 5 रुपयांना मिळत होत्या, त्या आता 10 रुपयांना मिळतात. जर तुम्हाला महागाईची तुलना करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला 48 वर्षे जुने विमान तिकीट दाखवणार आहोत, जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

गेल्या काही दिवसांपासून लोक खूप सोशल मिडियावर जुन्या काळातील तिकिटे आणि बिले शेअर करत आहेत. सुमारे 50 वर्षांपूर्वी कुठे 2 रुपयांना डोसा, चहा 50 पैशांना आणि इतर अनेक गोष्टी 50 रुपयांना मिळत होत्या.

दरम्यान, आता काही लोक जुन्या काळातील विमान प्रवासाचे तिकिटे शेअर करत आहेत. एका व्यक्तीने सुमारे 50 वर्षांपूर्वीचे मुंबईहून गोव्याच्या विमान प्रवासाचे तिकीट शेअर केले आहे.

Mumbai Goa Flight
Goa Viral Video: गोवा विमानतळावर राडा; मुंबईकडे जाणारी फ्लाइट रद्द अन् प्रवासी भडकले, पाहा व्हिडिओ

तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण मुंबई - गोवा प्रवासासाठी तुम्ही आज हजारो रुपये मोजता, ते 48 वर्षांपूर्वी फक्त 85 रुपये होते. 1975 चे इंडियन एअरलाइन्सचे तिकीट ट्विटरवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवास भाडे फक्त 85 रुपये लिहिलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिकीट पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

कारण मुंबई - गोवा विमानप्रवासासाठी आजकाल किमान 1,800 आणि कमाल 12,000 पर्यंत तिकीट पर्याय उपलब्ध आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे तिकीट @IWTKQuiz या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. "मुंबई ते गोवा 85 रूपयांत." असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com