Dabolim Airport: एक मंत्री दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचे षडयंत्र रचतोय; काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

Goa Bench: दाबोळी ते कुठ्ठाळी - सांकवाळ - क्वीनीनगरपर्यंत उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम त्वरित बंद करण्याचा आदेश गोवा खंडपीठाने दिली आहे.
Dabolim Sancoale Flyover
Dabolim Sancoale FlyoverDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Sancoale Flyover Work Stops

वास्को: दाबोळी ते कुठ्ठाळी - सांकवाळ - क्वीनीनगरपर्यंत उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाण पुलाचे काम त्वरित बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जारी केल्याची माहिती दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिली आहे.

आल्त दाबोळी ते सांकवाळ एमईएस कॉलेजच्या जंक्शनपर्यंत उभारलेल्या उड्डाण पुलाच्या खांबांची उंची, नौदलाच्या नियमापेक्षा जास्त असल्याने भविष्यात उड्डाण पूल नौदलासाठी धोका निर्माण करू शकतो. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गोवा नौदलाकडून उड्डाण पुलाचे काम करण्याचा परवाना न घेतल्याने अखेर उच्च न्यायालयाने उड्डाण पुलाचे काम आजपासून बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्याचे खासदार कॅ. फर्नांडिस यांनी सांगितले.

एका मंत्र्याला दाबोळीच्या जनतेने निवडून देऊनसुद्धा तो मंत्री येथील विमानतळ बंद पाडण्याचे षडयंत्र रचत आहे.

हा मंत्री दाबोळी विमानतळ बंद पाडण्यासाठी जीएमआर कंपनी व कॅसिनो माफियांच्या इशाऱ्याव्दारे, दाबोळी ते सांकवाळपर्यंत उड्डाण पूल उभारून दाबोळी विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण कॅसिनो माफियाने पेडणे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या आहेत. यात तो मंत्रीसुद्धा भागीदार असल्याचा दावा कॅ. फर्नांडिस यांनी केला आहे.

नौदलाने चारवेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उड्डाण पूल उभारण्यासाठी रीतसर नौदलाचा परवाना घेण्याचे आदेश जारी केले होते, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नौदलाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने नौदलाने गोवा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उड्डाण पुलाचे काम बेकायदेशीर असून ते त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी केली. यामुळे उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला काम बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती कॅ. फर्नांडिस यांनी दिली.

Dabolim Sancoale Flyover
Sancoale: सांकवाळ पंचायतीची बैठक गुंडाळली फक्त 5 मिनिटांत! 65 लाखांच्या बिलांना मंजुरी; पंच नाईक यांचे आरोप

दाबोळी विमानतळ बंद करण्याचा डाव

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी उड्डाण करणाऱ्या विमानांना कायमस्वरूपी बंद करण्याचा हा उड्डाण पूल उभारण्याचा हेतू आहे. यामागे राज्य भाजप सरकारचा एक मंत्री असून तो बेकायदेशीर फार्म हाउस, विमानतळावरील सोने तस्करी करणारा व इतर अनेक गैरप्रकारची कामे करणारा असल्याचा खळबळजनक आरोप खासदार कॅ. फर्नांडिस यांनी केला आहे.

Dabolim Sancoale Flyover
Shivjayanti Dabolim: छत्रपती शिवराय सर्व धर्मीयांचे रक्षक! मंत्री गुदिन्होंचे गौरवोद्गार; दाबोळी येथेे शिवजयंतीनिमित्त अभिवादन

या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाका

दाबोळी ते सांकवाळपर्यंत उड्डाण पूल झाल्यास, दाबोळी विमानतळ फक्त नौदलाच्या फायटर विमान वापरासाठी ठेवण्यात येणार असून नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी खासदार कॅ. फर्नांडिस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com