गोव्यात नव्यानं झालेलं मोपा विमानतळ (Mopa Airort) कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होणार अशा आशयाच्या चर्चांना राज्यात उधान आले आहे. विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त करत, सरकारचा दाबोळीला घोस्ट विमानतळ करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, यावर आता खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण देत, दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.
वास्को (Vasco) येथील मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथे क्रूझ टर्मिनल इमारतीच्या पायाभरणी करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दाबोली विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. असे आश्वस्त केले. तसेच, दाबोळी विमानतळाबाबत अफवा पसरवू नयेत, दोन्ही विमानतळ कार्यरत राहतील असे सावंत यांनी सांगितले.
परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी बुधवारी टॅक्सी चालकांशी चर्चा केली. टॅक्सी चालकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले नाही, तर त्याचा परिणाम होऊन विमानतळ बंद होऊ शकते असे वक्तव्य गुदिन्हो यांनी केले. यावर गोवा फॉरवर्ड पक्षाने सरकारकडून दाबोली विमानतळ बंद केले जाऊ शकते असा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी आरोप खोडून काढत विमानतळ बंद होणार नसल्याचे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.