Dabolim Airport: दाबोळी सुरुच राहणार; मंत्री गुदिन्हो यांचा पुर्नउच्चार

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार
Minister Mauvin Godinho On Dabolim Airport Issue
Minister Mauvin Godinho On Dabolim Airport IssueDainik Gomantak

Dabolim Airport: राज्यातील हवाई वाहतूक वाढत असल्याने दाबोळी विमानतळ कायम राहणार असल्याचे वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी एका बैठकीत शुक्रवारी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात दक्षिण गोवा हॉटेल मालकांतर्फे दाबोळी विमानतळ व परिसरात सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Minister Mauvin Godinho On Dabolim Airport Issue
Goa Mining : पन्नास वर्षांसाठी शाश्वत खाण व्यवसाय सुरू करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मंत्री गुदिन्हो यांनी दक्षिण गोवा हॉटेल मालक व विविध सरकारी यंत्रणा, नौदल, विमानतळ प्राधिकरण अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक नवे वाडे येथील कार्यालयात आयोजित केली होती. दाबोळी बंद होणार ही भीती संबंधितांनी मनातून काढून टाकावी. दाबोळी विमानतळ अनेक वर्षांपासून चांगली सेवा देत आहे. या विमानतळावरील विविध सुविधा, विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे. भविष्यात तेथील सुविधा व परिस्थिती आणखी कशी सुधारता येईल हे आम्हाला पहायचे आहे. तेथील जुनी टर्मिनल इमारत विकसित करण्यात येत असून तिचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन ती कार्यान्वित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Minister Mauvin Godinho On Dabolim Airport Issue
Konkani writer: नामवंत कोकणी लेखिका जयमाला दणायत यांचे निधन

दाबोळीकडे आमचे सतत लक्ष असल्याने दाबोळी विमानतळाबद्दल एक चांगला संदेश लोकांपर्यंत जात आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ भविष्यातही चांगली सेवा करीत राहील यात शंकाच नसल्याचे ते म्हणाले. पर्यटन हंगामासाठी टूर ऑपरेटर्स आगाऊ योजना आखतात. नौदलाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नौदलाने अधिकाधिक नागरी उड्डाणे सामावून घेण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळावर विमानांची ये-जा वाढू शकते. मागील काही आकडेवारी पाहिल्यास दाबोळी विमानतळावर अपेक्षेपेक्षा अधिक उड्डाणे हाताळण्यात आली असल्याचे दिसून येते, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com