Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

Dabolim Airport Passenger Decline: गोव्याच्या विमान वाहतुकीची दिशा बदलत असल्याचे चित्र असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे.
Mopa Airport passenger traffic increase
Dabolim Airport passenger trafficDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या विमान वाहतुकीची दिशा बदलत असल्याचे चित्र असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्येत तब्बल ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दाबोळीची घट आणि मोपाची वाढ यामुळे राज्यातील हवाई वाहतुकीचा कल मोपाकडे सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘मोपा’वर प्रवासी वाहतूक वाढत असताना दाबोळीवरील प्रवासी संख्येत घट होणे हा राज्यातील विमान वाहतुकीतील बदलत्या प्रवाहाचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर काही विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे तेथे हलविल्याने त्याचा परिणाम दाबोळीवरील वाहतुकीवर झाला.

Mopa Airport passenger traffic increase
Ganesh Idol Theft: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

त्यातच मोपावर नव्या मार्गांवरील तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढल्याने तेथील प्रवासी वाहतुकीतही वाढ झाली आहे. मात्र, दोन्ही विमानतळांवरील प्रवासी संख्येतील बदलांचा नेमका परिणाम समजून घेण्यासाठी विमान कंपन्यांची उड्डाणे, मार्गांची संख्या, हंगामी मागणी तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे प्रमाण यांचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.

दाबोळीसमोर आव्हान; विमान वाहतुकीचे बदलणार चित्र

१ दाबोळी विमानतळ गोव्यातील जुना नागरी विमानतळ आहे, तर मोपा येथे मोठ्या क्षमतेची विमानतळ सुविधा उभारण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील विमान वाहतुकीचे नियोजन करताना दोन्ही विमानतळांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्याशी जोडलेली रस्ते वाहतूक, प्रवाशांची सोय आणि विमान कंपन्यांच्या उड्डाणांचे नियोजन यांचाही विचार करावा लागणार आहे.

Mopa Airport passenger traffic increase
Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

२ मोपाकडे प्रवासी वाहतूक वाढत असताना दाबोळीची विद्यमान भूमिका कायम ठेवण्याचे आव्हानही सरकारसमोर राहणार आहे. दोन्ही विमानतळांमधील प्रवासी वाहतुकीतील वाढता फरक पाहता, गोव्याच्या भविष्यातील हवाई वाहतुकीचे नियोजन कोणत्या दिशेने केले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com