Hotel In Goa
Hotel In Goa Dainik Gomantak

नवरा गर्लफ्रेंडसोबत 5 दिवस गोव्यात होता, आरोप करत पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज; कोर्ट म्हणाले, 'हॉटेलचे रेकॉर्ड...'

पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेत हॉटेलची कागदपत्रे आणि रेकॉर्ड जतन करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला.
Published on

पतीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप करत पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पती पाच दिवस गर्लफ्रेंडसोबत गोव्यात होता असेही पत्नीने म्हटले आहे. याबाबत सुनावणी देताना दिल्ली उच्च न्यायालयाने गोव्यातील संबधित 'त्या' हॉटेलचे गेस्ट रजिस्टर, बुकिंग चालान, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) जतन करण्याचे निर्देश दिले आहेत.

हॉटेलचे रेकॉर्ड कोणत्याही पक्षकारांना दिले जाणार नसून, ते संबंधित त्रयस्त व्यक्तींद्वारे बनवले जाईल आणि त्याची देखभाल केली जाईल. खटल्याच्या योग्य बिंदूवर निर्देश दिल्यावरच ट्रायल कोर्टासमोर हजर केले जाईल. असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, या जोडप्याने 2012 मध्ये लग्न केले परंतु 2017 मध्ये पत्नीने पती नांदवत नसल्याचा आरोप केला. पतीने सोडून दिल्याच्या कारणावरून तिने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. जुलै 2021 मध्ये तिला एक जुना फोन सापडला ज्यात तिला पतीचे आणि दुसर्‍या महिलेमधील संभाषणाची माहिती मिळाली.

त्यानंतर तिने विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत डिसेंबर 2021 मध्ये घटस्फोटासाठी दुसरी याचिका दाखल केली, याचिका अद्याप कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे.

Hotel In Goa
रोजगारासाठी गोव्यात येण्यापूर्वीच घात झाला, ट्रेनमध्ये चढताना मजुराचा पाय घसरला अन्...

तक्रारदार महिलेचा पती 15 ते 20 ऑगस्ट 2020 या काळात गोव्यातील एका हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत थांबला होता, अशी माहिती तिला मिळाली. महिलेने संबंधित दंडाधिकार्‍यांसमोर 27 ऑक्टोबर 2019 ते 27 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पतीच्या फोन नंबरच्या कॉल रेकॉर्डसह माहिती प्रदान करण्यासाठी अर्ज केला.

दरम्यान, न्यायदंडाधिकाऱ्यांनी महिलेचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनीही हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर दोन्ही आदेशांना आव्हान देत पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेत हॉटेलची कागदपत्रे आणि रेकॉर्ड जतन करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला.

खटल्यातील पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी त्रयस्थ पक्षाला महत्त्वाचा पुरावा जतन करण्याच्या निर्देशासाठीच पत्नीची याचिका होती हे लक्षात घेऊन न्यायालयाने तिला दिलासा दिला आणि हॉटेलचे सर्व रेकॉर्ड जतन करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com