Who is D Gukesh? अचाट बुद्धिमत्तेच्या जगज्जेता डी. गुकेशने गोव्यातही गाजवली होती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

D Gukesh Goa Connection: भारताचा बुद्धिबळातील नवा जगज्जेता डी. गुकेश जानेवारी २०१९ मध्ये ग्रँडमास्टर किताबासाठी पात्र ठरला तेव्हा १२ वर्षे, सात महिने व १७ दिवसांचा होता. तेव्हा तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ठरला होता. त्यानंतर जून २०१९ मध्ये ‘गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर’ स्पर्धेत अचाट बुद्धिमत्तेचा बुद्धिबळपटू खेळला होता.
Gukesh Dommaraju
Gukesh DommarajuX
Published on
Updated on

D Gukesh Goa Connection History

पणजी: भारताचा बुद्धिबळातील नवा जगज्जेता डी. गुकेश जानेवारी २०१९ मध्ये ग्रँडमास्टर किताबासाठी पात्र ठरला तेव्हा १२ वर्षे, सात महिने व १७ दिवसांचा होता. तेव्हा तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ठरला होता. त्यानंतर जून २०१९ मध्ये ‘गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर’ स्पर्धेत अचाट बुद्धिमत्तेचा बुद्धिबळपटू खेळला होता.

गोव्यात दुसऱ्यांदा झालेली ग्रँडमास्टर स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये रंगली होती. त्यावेळी स्पर्धेत ३६ ग्रँडमास्टरनी भाग घेतला होता, त्यात गुकेशसह १५ भारतीय ग्रँडमास्टर होते.

Gukesh Dommaraju
Sunburn Festival: 'न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची भूमिका होणार स्पष्ट'; आमदार आर्लेकर ‘सनबर्न’ विरोधाबाबत ठाम

गोव्याचे बुद्धिबळातील पहिले आंतरराष्ट्रीय आर्बिटर (आयए) अरविंद म्हामल यांनी गुकेश जगज्जेता बनल्यानंतर गुरुवारी त्याच्या गोव्यातील स्पर्धा सहभागाच्या आठवणीस उजाळा दिला. तेव्हा म्हामल फिडे आर्बिटर (एफए) होते आणि गोव्यातील ग्रँडमास्टर स्पर्धेसाठी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

म्हामल यांनी सांगितले, की ‘‘लहान वयान ग्रँडमास्टर बनल्यानंतर गोव्यात खेळणाऱ्या गुकेशकडे साऱ्यांचेच लक्ष होते. कुशाग्र बुद्धीच्या या खेळाडूने स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करताना दहावा क्रमांक पटकावला होता. त्याची खेळण्याची शैली अचाट गुणवत्तेची साक्ष देणारी होती.’’

Gukesh Dommaraju
Bicholim Crime: गहाळ की चोरी! डिचोलीत महिलेचे सात लाखांचे दागिने गायब; पोलिस तपास सुरु

गोवा संघटनेकडून अभिनंदन

सिंगापूर येथे बुद्धिबळ जगज्जेता बनल्यानंतर गोवा बुद्धिबळ संघटनेने डी. गुकेश याचे अभिनंदन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळणकर, तसेच कार्यकारी समिती सदस्यांनी गुकेशचे कौतुक केले. सचिव केणी यांनी सांगितले, की ‘‘सिंगापूर येथे जगज्जेतेपदाचा ११ व १२ व्या डाव सुरू असताना मी साक्षीदार होतो. गुकेशने शानदार खेळ करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com